Copy Not Allowed

लिंगभेद भ्रम अमंगळ लोकसत्ता पाक्षिक सदर

लिंगभेद भ्रम अमंगळ


अशोक रावकवी 

अशोक  रावकवी , समलिंगी तसेच आपल्यासारख्या इतर लोकांच्या हक्कांसाठी झगडणारे एक बुजुर्ग व्यक्तिमत्व म्हणून बऱ्याच लोकांना माहित आहेत. स्वतः एक पत्रकार असणारे अशोकजी आज ७१ वर्षांचे आहे . त्यांच्या तारुण्यात सुरु झालेला हा अस्तित्वाचा लढा आजही सुरूच आहे .



त्यांच्या खळबळजनक आयुष्याची कहाणी आणि LGBTQ समुदायासंदर्भातील त्यांचे चिंतन लोकसत्ता सारखे प्रतिष्ठित दैनिक दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध करत आहे.

तुम्हाला या लिखाणाची माहिती व्हावी आणि  LGBTQ समुदायाबद्दल काही अभ्यासपूर्ण माहिती समजावी म्हणून या लेखांच्या लिंक मी शेअर करतो आहे .

मन मारून राहणे  म्हणजे आयुष्य जगणे नव्हे तर मुक्तपणे जगणे, कुठलीही अपराधी भावना मनात न आणता जीवनाचा आनंद घेणे हाच  जीवनाचा उद्देश आहे . अशोकजींचे  लिखाण वाचून त्यांनाही असेच वाटत असावे असे माझे मत झाले. तर या आठवड्यात नेहेमीच्या गोष्टीला सुट्टी. या आठवड्यात खाली दिलेले लेख वाचा....मुंबईचा एक नवा  पैलू समजून घ्या .

कॉपीराईटचा भंग नको म्हणून मी त्यांचे लेख इथे छापले नाहीत . लेखनाचा मूळ स्रोत म्हणजे लोकसत्ता . त्या लिंक्स खाली दिल्या आहेत जरूर वाचा ...

६ सप्टेंबरच्या ‘कलम ३७७’ वर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातला पहिला फायदा म्हणजे बहुधा समलिंगी व्यक्तींना लग्न करता येईल व अधिकृतपणे साहचर्यात राहता येईल. पण हे कायदेशीर करण्याचा इतका आग्रह का? थांबा, जरा विस्तारानंच सांगतो.

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/freedom-of-homosexual-men-and-women-after-verdict-on-section-377-1765768/

================================================================
समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं कलम ३७७ रद्द झालं आणि एलजीबीटी समुदायात आनंदाचं वातावरण पसरलं खरं, परंतु आता खरी जबाबदारी सुरू झाली आहे. गेली २५ वर्ष ‘हमसफर ट्रस्ट’ काम करते आहे. मुंबईतल्या एलजीबीटी समुदायाचं रक्षण करण्यासाठी ‘हमसफर’कडे पुरेशी सेना आहे. आता जे लोक कायद्याचा गैरवापर करतील त्यांच्याविरुद्ध या साऱ्या मुलांना प्रशिक्षण देऊन शिस्तबद्ध पद्धतीनं काम करण्याची गरज आहे.

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/hamsafar-trust-responsibility-to-protect-lgbt-community-1756208/

================================================================

 आम्ही महापालिकेसोबत आरोग्यविषयक काम करतो असं तिथं आम्ही अभिमानानं सांगितलं होतं. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांसोबतदेखील आम्ही काम करतो हे ऐकून तर अनेकांना धक्काच बसला. हे पक्ष आमच्या विरोधात आहेत असा गैरसमज तिथं दिसतो. आम्ही केवळ या आरोपाला नाकारूनच थांबलो नाही, तर ‘भारतीय जनता पक्ष’ आणि ‘शिवसेना’ या पक्षांच्या नेत्यांनी ‘हमसफर ट्रस्ट’ला भेट देऊन आम्हाला अत्यंत सन्मानाची वागणूक दिली हेदेखील आम्ही त्यांना सांगितलं. प्रिया दत्त यांच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्यानंदेखील दोन वर्षांपूर्वी आमच्या ‘एलजीबीटी’ परिषदेचं उद्घाटन केलेलं होतं.


https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/ashok-row-kavi-article-on-homosexulity-freedom-1746498/
================================================================
एलजीबीटी समुदाय खूप आधीपासून अस्तित्वात आहे, मात्र नंतरच्या इतिहासात त्याचा उल्लेख मुद्दामच गाळण्यात आला.  दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांनी प्रयत्नपूर्वक आपला सारा प्राचीन इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याजागी स्वत:ची सांस्कृतिक मूल्यं प्रस्थापित केली, त्यामुळे आता आपल्याला इतिहास पुन्हा एखाद्या आरशावरची धूळ झटकून आपलं रूप नीटपणे पाहाणं गरजेचं आहे.

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/ashok-row-kavi-article-on-feature-of-the-gay-community-1737190/

================================================================

भेट दिल्यावर मुंबईतल्या साऱ्या समलिंगी लोकांसोबत काम करण्यासाठी तिथली एक खोली पुरेशी आहे असं डॉ. ठाणेकरांना वाटत होतं. ‘‘सध्या तुम्ही मुंबईत एक लाख असे लोक आहेत असं म्हणताय खरं, पण आत्तातरी मला फक्त तुम्ही दोघंच इथं असलेले दिसताय,’’ 

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/mother-role-in-life-of-ashok-rao-kavi-during-illness-1713171/

================================================================
आमची दिल्ली, कोलकाता आणि  चेन्नई इथल्या काही लोकांशी ओळख होती. आम्ही त्या प्रत्येकाला नियतकालिकाच्या २५ प्रती पाठवण्याचं ठरवलं. त्यांनी त्या प्रती विकल्या, की आम्हाला पुढचा अंक काढता आला असता. अशा प्रकारे समलिंगींसाठी असणारं भारतातलं पहिलं ‘बॉम्बे दोस्त’ या नावाचं नियतकालिक आम्ही सुरू केलं. 

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/bombay-dost-gay-magazine-humsafar-trust-gay-organisation-1705261/


================================================================

जेव्हा मुंबई शहरात एचआयव्ही/ एड्सचा धोका पराकोटीला पोचला होतातेव्हा मुंबा-आई आणि मुंबई महापालिकाया दोघीही माझ्या मदतीला धावून आल्या. तोवर या रोगाचा मुकाबला करण्यासाठी कोणतंही औषध नव्हतं. पण या दोघींनीही मात्र मला मुंबईमध्ये माझ्या समुदायाच्या लोकांना एकत्र आणायला मदत केली..

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/ashok-row-kavi-article-1696829/


================================================================

एक घटना अशी घडली, की शरीर हीसुद्धा मुंबईच्या बाजारांमध्ये खरेदी-विक्री केली जाणारी एक वस्तू आहे, हे माझ्या लक्षात आलं. एका ‘गे पार्टी’मध्ये ही घटना घडली होती. तिथं सर्व प्रकारचे लोक होते – सर्व प्रकारचे म्हणजे सगळ्या जातींचे, धर्माचे आणि आर्थिक स्तरातले गे लोक मढ आयलंड इथल्या एका पार्टीला जमलेले होते. मी एका कोपऱ्यात शांतपणे हातात माझ्या पेयाचा ग्लास धरून उभा होतो. तेवढय़ात एक उंच जर्मन माणूस माझ्याकडं आला आणि त्यानं हिंदीत गप्पा सुरू केल्या.

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/articles-about-gender-issues-and-sexuality-3-1689506/


================================================================


आमच्या एलजीबीटी समुदायामध्ये कोणतेच नियम नाहीतकारण आमच्या अशा नातेसंबंधांना कोणतीच सामाजिक मान्यताही नाही. वादळी समुद्रात हाकत असलेल्या बोटीसारखी ही सारी नाती आहेत. तथाकथित नैतिकता आणि मूल्यांच्या रूपात दिसणाऱ्या आकाशातल्या ताऱ्यांचा अंदाज बांधून नात्यांची ही छोटीशी बोट आम्हाला योग्य दिशेला न्यावी लागते. पण नेमकी कोणती नैतिकता आणि कोणती मूल्यं आम्ही पाळायची? .. मात्र त्या घटनेनंतर अन्य कुठल्याही समलैंगिक किंवा विवाहित पुरुषाचं स्थिर असणारं नातं आपण तोडायचं नाहीअशी मी स्वत:शी प्रतिज्ञा केली..

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/ashok-row-kavi-article-in-loksatta-1682116/

================================================================

त्या काळातच तो प्रकार घडला. वैयक्तिक आयुष्यात मी ‘कसा’ आहे, हे या दोन्हीही वृत्तपत्रांमधल्या माझ्या सहकाऱ्यांसमोर अचानकपणे उघड झालं. एका शनिवारी रात्री वृत्तपत्र छापायला गेल्यावर आम्ही विरारला जाणारी उशिराची ट्रेन पकडली. शेवटच्या या लोकलला समलिंगी समुदायामध्ये ‘क्वीन्स् एक्स्प्रेस’ या नावानं ओळखलं जात असे. 

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/articles-about-gender-issues-and-sexuality-2-1673525/

================================================================

भारताला हिजडा वा तृतीयपंथीय संस्कृतीची ओळख पहिल्यांदा ‘कोठी’ या प्रकारच्या नृत्यातून झाली. (‘कोट्टी’ या कन्नड / तेलुगू शब्दाचा अर्थ आहे ‘नाचणारं माकड’). या नृत्यामध्ये नाजूक दिसणारे तरुण फक्त पुरुष प्रेक्षकांसमोर नृत्य करत असत आणि श्रीमंत प्रेक्षकांकडून पसे मिळवत असत. असे हे बायकी दिसणारे पुरुष आणि तृतीयपंथीय यांनी आपली वेगळी ‘घराणी’ स्थापन केली.

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/the-life-of-lesbian-gay-bisexuality-and-transgender-part-7-1666597/

================================================================

 पण तिनं मृत्यूअगोदर व्यक्त केलेल्या इच्छेप्रमाणं मी थेट हरिद्वारला जाऊन एकाचवेळी तिच्यासाठी, १९७४ मध्ये मृत्यू पावलेल्या माझ्या बाबांसाठी, माझी आत्या प्रेमाक्का आणि (मृत्यू पावलेले) माझे दोन धाकटे भाऊ – या साऱ्यांसाठीच अंतिम धार्मिक विधी केले. विशेष म्हणजे कुटुंबासाठी असणारे हे सारे विधी करायला अखेर एक समलिंगी मुलगाच कामी आला.

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/the-life-of-lesbian-gay-bisexuality-and-transgender-part-5-1658907/

================================================================

मी जेव्हा १२ वर्षांचा झालो, तेव्हा माझे बाबा माझ्या लैंगिकतेबाबतच्या सततच्या आणि खोलवरच्या प्रश्नांच्या माऱ्यामुळे पार त्रासून गेले. अखेर त्यांनी मला हॅवलॉक एलिसचं लेखन संग्रहित केलेलं ‘द सायकॉलॉजी ऑफ सेक्स’ हे पुस्तक आणून दिलं. लैंगिकता आणि लिंगभावाचा अभ्यास यासारख्या सामाजिक शास्त्रांमध्ये युरोपात त्यावेळी मोठीच प्रगती होती. हॅवलॉक एलिस, सिगमंड फ्रॉईड, मॅग्नस हर्शफिल्ड, कारपेंटर आणि त्यानंतर अल्फ्रेड किन्सी या शास्त्रज्ञांनी मला लैंगिकसंबंध, लैंगिकता आणि लिंगभाव यांकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/articles-about-gender-issues-and-sexuality-1649911/

================================================================

ज्यांनी ‘नटरंग’ हा चित्रपट पाहिला असेल, त्यांना त्यातली ‘मावशी’ची व्यक्तीरेखा अगदी चांगल्या प्रकारे लक्षात राहिलेली असेल. एखादी व्यक्ती जन्मानं स्त्री आहे, की पुरुष? तिच्या मनात या दोन्ही लिंगभावांची कशी सरमिसळ झालेली असते? हा गुंता सोडवणं किती कठीण आहे, याचं एक सुंदर उदाहरण या चित्रपटातून मांडण्याचा दिग्दर्शकानं प्रयत्न केला होता.

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/the-life-of-lesbian-gay-bisexuality-and-transgender-part-4-1642560/

================================================================

हा कथासंग्रह प्रसिद्ध होताच मोठीच खळबळ उडाली. याचं कारण म्हणजे या संग्रहातल्या कथांमध्ये उग्र यांनी २०च्या शतकाच्या सुरुवातीला असणाऱ्या शहरी भागातील पुरुष-पुरुष प्रेमाचे अगदी बारकाव्यांसकट वर्णन केलेले होते. कथांची शीर्षकेही ‘दिल्लीचे दलाल’ आणि ‘आयुष्य छोटं आहे, मजा करू या’ अशी वाचकाला काहीशी चाळवणारीच होती. एकीकडे भारतात स्वातंत्र्यसंग्राम सुरू असतानाच, दुसरीकडे शहरी आयुष्यातल्या हळव्या बाजूंचे या कथांमध्ये चित्रण केलेले होते. उग्र आणि त्यांचा ‘मतवाला’ हा कथासंग्रह, या दोहोंही विरुद्ध लेखक-प्रकाशक बनारसीदास चतुर्वेदी यांनी मोठीच आघाडी उघडली. 


https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/the-life-of-lesbian-gay-bisexuality-and-transgender-part-3-1636312/

================================================================

समलैंगिकता ‘बरी’ करण्यासाठी फ्रॉइडच्या चिकित्सापद्धतीसोबतच अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या भोंदूगिरीच्या पद्धती कुचकामी ठरल्या. अगदी जनुकीय क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे आपल्या डीएनएमध्ये ‘गे जीन’ शोधण्याचे प्रयत्नही अयशस्वी ठरले. अखेर जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकतेला मानसिक आजाराच्या यादीतून आणि सर्व प्रकारच्या वैद्यकीय विकृतींमधून काढून टाकलं. समलैंगिकांसाठी हा खूप मोठा विजय होता.

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/who-removed-homosexuality-from-mental-illness-1629386/

================================================================

अमेरिकेमधे २०व्या शतकाच्या मध्यात समलिंगी व्यक्तींवरचा पहिला खरा शास्त्रशुद्ध अभ्यास अल्फ्रेड किन्सी या शास्त्रज्ञानं केला. संशोधनाअखेर किन्सीनं रॉकफेलर फाऊंडेशनच्या हाती जणू एक टाइम बॉम्बच ठेवला होता. या संशोधनासाठी तब्बल ५,००० पुरुषांची लैंगिक वर्तनाबाबत सखोल चिकित्सा करण्यात आली होती. पुढे या अभ्यासाबाबत अनेक वाद-वादंग निर्माण असलेतरी तो पूर्णत: कधीच रद्दबातल ठरवला गेला नाहीकी कधीच दुर्लक्षितही होऊ शकला नाही.

https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/homosexuality-study-alfred-kinsey-american-biologist-1622251/

================================================================

हे सदर आमच्याविषयी आहे. आम्ही कोण आहोत? कोणी वेगळे आहोत का? आम्हीसुद्धा आपले मुलगे, भाऊ, मुली, बहीण, काका,मावशी, आजी अगदी रक्ताचे नातेवाईक आहोत. जशी आपल्या कुटुंबातील कुणी तरी डावखुरी व्यक्ती असते, पण कोणाला तिचे नवल वाटत नाही. तशीच ही लैंगिकतासुद्धा आहे. आम्ही चुकीच्या शरीरात जन्माला आलो आणि आता ते लक्षात आल्यावर आमचे खरे जीवन जगू इच्छितो, इतके सोपे आहे हे.


https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/the-life-of-lesbian-gay-bisexuality-and-transgender-2-1615620/











No comments:

Post a Comment

Followers