Copy Not Allowed

Friday 19 April 2019

पार्टनर हवा? मग एवढे कराच Gay Lifestyle Tips

मुलगा पटवण्याच्या टिप्स हव्यात ? मग स्वतः मध्ये बदल करायला तयार व्हा . तुमच्या प्रयत्नांना यश लाभयचे असेल तर तुम्हीही थोडे कष्ट घ्यायला हवेत. बिट्टू आणि तेजसच्या गप्पांमधून  मिळालेल्या या हिंट्स  तुमच्या कमी येतील . #marathigay



तेजसच्या आयुष्यात अनिमेषच्या येण्याने काय काय बदल झाले याची चर्चा त्याच्या बरोबर करत असताना एक जाणवले की तेजस सारखी तरुण मुले आपल्याला काय हवं आहे आणि काय नको याबद्दल खूपच स्पष्ट विचार करतात. Gridr आणि फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्समुळे, जो मिळेल त्याला हो म्हणायचा गाढवपणा हे लोक करत नाहीत. मग मी तेजसला आणि त्याच्या सारख्या नव्या पिढीला नक्की काय आवडतं आणि काय आवडत नाही हे सांगण्यासाठी बोलते केले.

खाली दिलेल्या बर्‍याच गोष्टी तेजस आणि माझ्या चर्चेतून निष्पन्न झालेल्या आहेत. आमचे दोघांचे अनुभव आणि आमच्याकडे असलेली माहिती या लेखात आहे. आपल्या ब्लॉगच्या वाचकांना तिचा नक्की उपयोग होईल आणि उपयोग करून घेता येईल याची खात्री आहे.

नेट पॅकचा मुख्य उपयोग पॉर्न बघायलाच होतो. मी पण बघतो .पण वासोटा ट्रेकनंतर मी त्यातल्या मुलीच्या पुच्चीपेक्षा पुरुषाच्या सोट्याकडे जास्ती लक्ष देऊन बघायला लागलो. कधी तरी गे कॅटेगरी सुद्धा जाऊन पहायला लागलो. देसी गे सेक्स क्लिप्स ( desi gay sex clips) असा सर्च दिला की दुनिया भरचे व्हिडिओ दिसतात. मी तेही पहायला लागलो.   अजून कुठे माझी कंड, म्हणजे खाज भागते का? याचे ऑप्शन्स मी शोधायला लागलो.

एकदा मुतारीत उभा राहून धार मारत होतो तर बाजूला एक जण येऊन उभा राहिला. हलवायला लागला. मी एकदम गरम झालो. अनिमेषनंतर असा पहिलाच कुणी तरी, जो माझ्या समोर बिनधास्त मुठ्ठ्या मारत होता. मला ते बघावेसे वाटले. बाजूचा माणूस माझ्याकडे बघत होता.त्याच्या नजरेत मला झवायची इच्छा पुरेपूर भरलेली होती. मी नुसता बघत होतो आणि तो माझ्या समोर मुद्दाम गाळत उभा होता. त्याने मला हलवतोस का म्हणून विचारले असते तर मात्र मी नाहीच म्हणालो असतो. काहीतरीच होता दिसायला. कुणीही काय ? काही चॉइस आहे की नाही?

काही वेळाने त्याचा माझ्या समोरच गळून चिक बाहेर आला. त्याने लंड झटकला आणि तो निघून गेला. मी पुढच्या माणसाची वाट पाहत उभा राहिलो. पण मुतारीत गाळायची कल्पना काही मला आवडत नाही. घाई घाईत , कुणीही येईल त्याच्याबरोबर असले काही करायचे  आणि तिथले अस्वच्छ वातावरण, दुर्गंध  या सगळ्याच गोष्टी मला नकोशा वाटतात . हे लक्षात आल्यावर  मी मुतारीत जाणे बंद केले. 

या आवडी निवडीबरोबर माझ्यामध्येही काही बदल घडू लागले होते. पूर्वी दोन दोन महीने कटींगला न जाणारा मी , आता दर महिन्याला एकदा तरी सलूनचे तोंड पाहू लागलो. दाढी वाढवली होती. कधीतरी ब्लु फिल्म पाहताना लक्षात आले की मला दाढी वाढलेल्या किंवा दाढी ट्रिम केलेल्या लोकांच्या ऐवजी सफाचट म्हणजे क्लीन शेव्हन दाढी किंवा मिशा काढलेले पुरुषच आवडतात. मग मी पण दाढीला रजा दिली आणि गुळगुळीत चेहरा बनवला. 

एका मित्राला पटवण्याचा प्रयत्न करत असताना मी त्याच्या गालांवरून हात फिरवला. त्याच्या दाढीचे केस मात्र फारच राठ होते. एकदम मोरी घासायच्या ब्रश सारखे. त्या दाढीला हात लावून माझी त्याला झवायची इच्छाच मेली. तुम्हाला दाढी वाढवयाचीच असली तर दाढी धुताना, साबणा ऐवजी मोईश्चरायझर वापरा. म्हणजे दाढीचे केस जरा मऊ राहतील आणि दाढीला खाज येणार नाही. दाढी खाजवणारा माणूस झवण्यासाठी एकदम कंडम. साला इथे खाली खाज येतेय आणि हा दाढी खाजवत बसलाय.

एकदा मॉल मध्ये गेलो तर एक चिकू बॉय म्हणजे पत्रा माल असलेला मुलगा दिसला. मी बराच वेळ त्याच्या मागे मागे फिरत होतो. तो जर मुतारीकडे वळला असता तर मी पण चान्स मारला असता. पण एका क्षणी तो माझ्या जवळून गेला. आम्ही दोघे एका अरुंद अश्या गॅलरीत होतो. त्या मुळे माझ्या पासून अगदी जवळून... खरं तर माझ्या अंगाला घासूनच तो जात होता. मी माझा हात त्याच्या चेनवर फिरवण्याचा प्रयत्न करत होतो पण माझा श्वास घशात अडकला.

त्याच्या अंगाला घामाचा प्रचंड दुर्गंध येत होता. कदाचित त्याने कालचेच कपडे घातले आसवेत किंवा त्याला खूप घाम येत असावा. पण त्या भपकार्‍या बरोबर माझी, त्याच्या बद्दल जागृत झालेली, कामेच्छा गायब झाली. ताठलेल्या बुल्ल्याने मान टाकली. मला शरीराची , घामाची दुर्गंधी किती भयंकर असू शकते हे जाणवले आणि मी त्याच मॉलमध्ये एका दुकानात जाऊन स्वतःसाठी एक मस्त डीओडरंट , परफ्यूम आणि शॉवर जेल घेतला.

आपल्या अंगाच्या दुर्गंधीमुळे कुणी हातचा माल जाऊ नये असे वाटत असेल तर एवढे कराच. मुंबईत असाल तर दिवसाला दोन वेळा आंघोळ, पुण्यात एकदा पुरते, करा . आंघोळ करताना आपल्या काखा , जांघा , लिंग , गुद भाग अगदी स्वच्छ सुगंधित करूनच बाहेर यायचं. काखेत डीओ मारून घाम येणार नाही असं पाहायचं. कपड्यावर अत्तर हवेच.

अंगावरच्या केसांमुळे घाम जास्ती येतो. त्यामुळे काखेतले केस , लवड्याच्या बाजूला असणारी झाटं काढून टाकावीत. एक लक्षात आलंय का ? लवडयाभवती जर जास्ती केस असतील म्हणजे जंगल वाढलेले असेल तर लंड छोटा दिसतो. तेच जर झाटांचे शेव्हिंग केले असेल तर लंड एकदम अजगर दिसतो. खरे वाटत नसेल तर अनुभव घेऊन पहा.

गुप्तांगावरील केसांप्रमाणेच अंगावरचे केस हा एक मोठा विषय असतो. काही जणांना केसाळ पुरुष आवडतात तर काही जणांना क्लीन बॉडी असणारे, अंगावर अजिबात केस नसणारे पुरुष आवडतात. डेटिंग साइट्सवर ही माहिती विचारलेली असते. तिथे खरी माहिती द्या.

काही वेळा हे वर्णन वाचून तुम्हाला कुणी भेटतो आणि तुम्ही खोटी माहिती दिली हे कळले तर त्याचाही मूड जाऊ शकतो. तुमच्या अंगावर केस असतील आणि तुमच्या लाडक्याला ते आवडत नसतील तर साफ करा. शेवटी तुमचा साथीदार खुश झाला तरच तुम्हाला त्याच्या गुहेत प्रवेश देणार आहे.

हात , पाय किंवा छातीवरचे केस रेझर आणि शेव्हिंग क्रीम वापरुन काढून टाकता येतात. लवड्यावरचे किंवा गांडीतले केस काढायचे असतील तर रेझर वापरा पण रेझरमुळे जखम होणार असेल तर सरळ व्हीट किंवा Anne French सारखे  हेयर रिमूव्हर वापरुन खालचा भाग एकदम गुळगुळीत करून ठेवत जा.

खूपच स्वछ बॉडी हवी असेल तर waxing करून घ्या. जरा त्रास होईल पण बॉडी एकदम स्त्रीसारखी मऊ आणि गुळगुळीत बनेल. तुम्ही ज्याला पटवायला बघत आहात त्याच्याशी कधी तरी असाच विषय काढून हे जाणून घ्या की त्याला काय आवडते आहे. त्या प्रमाणे तुमची सफाई करा. काही जणांना थोडेसे केस आवडतात. असे असेल तर ट्रिमर वापरुन जंगल थोडे कमी करा.

नाकातले आणि कानावरचे केस तर नकोच नको. असा माणूस एकदमच ई ई ई ई फिलिंग देतो. गबाळा, अस्वच्छ आणि यक्क. दाढी करताना थोडा वेळ काढा आणि मिशा , नाकातून डोकावणारे केस आणि कानातले केस यांची नियमित सफाई करा. कसं आहे ....तुम्हाला कुणी पटणार असेल तर शक्यता वाढेल.


एकदा फेसबुकवर सापडलेल्या एकाने फिल्मला जाऊ या म्हणून विचारले. फेसबुकवर जे काही फोटो होते ते खरे वाटत होते. आम्ही एका शो ची तिकिटे काढून एका ठराविक रांगेत बसायचे ठरवले. फिल्मला गर्दी होती. त्याने G5 सीट चे तिकीट काढले आणि मी त्याला संगितले G6 चे  तिकीट काढतो म्हणून. पण मी मित्राचे आणि माझे G3 आणि G4 चे तिकीट काढले. 

माझ्या मित्राला अर्थातच या कशाचीच कल्पना नव्हती. आम्ही पिक्चरला गेलो. जाहिराती चालू झाल्या आणि माझ्या शेजारी तो फेसबुकवर सापडलेला मुलगा येऊन बसला . बरा होता दिसायला. त्याला अपेक्षा होती की G 6 वर कुणी येईन म्हणून पण बराच वेळ सीट रिकामी होती. एकदा माझ्या बाजूला वळून त्याने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडाला गुटख्याचा प्रचंड वास येत होता. त्या वासामुळे मला अक्षरशः ओकारी आली. मी ताबडतोब तोंड फिरवले . मित्राशी गप्पा मारत तो पिक्चर पूर्ण पाहिला. बाहेर पडल्या बरोबर फेसबुकवरच्या माझ्या खोट्या नावाच्या प्रोफाइल वर गेलो आणि त्याला ब्लॉक करून टाकले.

तुमच्या तोंडाला गुटखा किंवा दारूचा वास येत असेल तर काही जणांना त्याची शिसारी येऊ शकते. काही जणांच्या तोंडाला दुर्गंधी येते पण बर्‍याच जणांना हे कळत नाही. घरचे लोक किंवा मित्र केवळ सभ्यता म्हणून असे स्पष्ट बोलून दाखवत नाहीत की बाबारे तुझ्या तोंडाला असह्य दुर्गंध येतो आहे. 

तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुणी सांगणार नाही तर माझे मलाच कसे कळेल की तोंडाला वास येतो आहे की नाही ?  सोप्पे आहे . जिभेने तुमचे मनगट चाटून ओले करा. दोन तीन मिनिटांनी मनगट वाळले की त्याचा वास घ्या. तोच तुमच्या तोंडाचा वास. आता इथे तुम्हालाच जाणवेल की आपल्या तोंडाचा वास कसा आहे आणि काही उपाय करण्याची गरज आहे का.

तोंडाला दुर्गंध येत असेल तर दोन उपाय आहेत. एक म्हणजे रोज दात  घासले की जीभ स्वच्छ करणे. जीभ स्वच्छ करण्यासाठी टंग क्लीनर मिळतात किंवा सध्या टुथ ब्रशने सुद्धा जीभ आतपर्यन्त साफ केली तर फायदा होतो. जिभेवर रात्री झोपेत असताना जो पांढरा थर जमा होत त्यामध्ये असणार्‍या जिवाणुंमुळे तोंडाला दुर्गंधी येते.

मुख दुर्गंधीचे दुसरे कारण म्हणजे पोट साफ नसणे. सकाळी प्रेशर न येणे किंवा चहा , सिगरेट असे काही घेतल्यावरच प्रेशर येत असेल तर कदाचित तुमचे पोट साफ नाहीये . काय कराल ? हिरव्या भाज्या, फळे, सॅलड , कोबी खाण्यात ठेवा. भरपूर पाणी प्या. रात्री झोपताना गुलकंद खा  किंवा इसबगोलची पावडर (पाण्यात टाकून ) घ्या. महिनाभर हा उपाय केलात तर पोट साफ होऊन तोंडाची दुर्गंधी जाईल.

तरीही मुख दुर्गंधी गेली नाही तर मात्र दातांच्या डॉक्टरला दाखवा. कदाचित हिरड्या किंवा दातांचा काही प्रॉब्लेम असू शकेल.

बिट्टू ची टिप्पणी  -- एक लक्षात ठेवा की तोंडाची दुर्गंधी हा मोठा चॅलेंज आहे. अजून तरी मला तोंडाची दुर्गंधी आवडते असे म्हणणारा पुरुष सापडला नाहीये.


पाणी भरपूर पिणे ही एक आवश्यक गोष्ट आहे. पाणी कमी पडले तर घामाची दुर्गंधी येते, पित्त वाढून बनियन , अंडरपॅंट लवकर खराब होते. या कपड्यांनासुद्धा अतिशय उग्र वास येतो. 'मी त्याच्या अंडीजचा वास घेतला'  असं वाक्य वाचायला भारी वाटलं तरी प्रत्यक्षात दुर्गंधीमुळे समोरचा पार्टनर काही गोष्टी करायला तयार होत नाही असं अनुभव आहे.

Grindr वापरुन पहायचा छंद लागला तेव्हा तर अजूनच अजिबोगरीब नमुने सापडले. सगळ्यांच्या प्रोफाइल मध्ये मॉडेल्सचे फोटो. कुणी खरे फोटो टाकत नाही. एकदा एक जण जवळपास आहे असे दिसले. मी त्याला विचारले की कुठे आहेस ? वर्णनावरून तर 26 वय आणि   अॅथलेटीक बॉडी लिहिले होते. म्हटले जवळच दिसतोय जाऊन पहावे. त्याने केएनपी च्या समोर उभा आहे असे संगितले. 

मी तिथेच एका दुकानापाशी उभा होतो. मान फिरवून इकडे तिकडे पहिले तर एक जण मान खाली घालून मोबाईल वापरताना दिसला . फारसे कुणी नव्हते तिथे. आणि त्याला मी दिसत नव्हतो. कुठला शर्ट घातला आहे असे विचारल्यावर तर माझी खात्रीच पटली. तोच तो होता. साधारण चाळीशीचा माणूस आणि चांगलाच जाड जूड. कसला जीम टोंड ....ही तर नुसतीच तोंद. मी अॅप बंद केले आणि तिथून सटकलो.

कपडे आणि कपड्यांचे फिटिंग हा पण असाच एक विषय. माझ्या मित्रामध्ये एक जण होता. अतिशय गबाळे ढगळ कपडे घालून फिरायचा. एकदा आम्ही पिकनिकला गेलो तेव्हा स्विमिंग पूलमध्ये उतरला आणि मी पाहताच राहिलो. कसली बॉडी होती त्याची. तिथेच शॉवर मध्ये घेऊन चोखावा असा रसाळ आंबा होता तो. एकदम पिळदार मसल, छाती साफ म्हणजे अजिबात केस नसलेली, टोकदार निप्पल, मांड्या पण एकदम कबड्डीपटू सारख्या. स्साला हा असला गबाळा का राहतो? इतका माल आहे तर झाकून का ठेवतो? मी जर मुलगी असतो तर याचे असले कपडे पाहूनच याला नकार दिला असता. 

तुमच्याकडे जर चांगली शरीरयष्टी असेल तर योग्य मापाचे कपडे घालून ते शरीर सौष्ठव दाखवायला लाजू नका. तुमच्या भारदार मांड्या, सडपातळ कंबर, बायसेप्स किंवा भरलेली छाती पाहून कुणीही तुमच्यावर मोहित होईल. फक्त कपडे तेवढे नीट घालत जा.

त्या मित्राला पाहून मी कपड्यांबद्दल, स्टाइलबद्दल   इंटरनेटवर वाचायला लागलो. कपडे नेहेमी फिट असावेत. स्वच्छ असावेत आणि योग्य जॅकेट, बूट , बेल्ट, कॅप या बरोबर घालावेत. तुम्हाला जर कुणी पटावे असे वाटत असेल त्या साठी थोडी मेहनत घ्यावीच लागते. रॉनच्या वेळी मला या सगळ्या माहितीचा खरा उपयोग झाला. 

जाड लोकांनी गबाळे कपडे घातले की जाडी झाकली जाते असा त्यांचा समज असतो. पण याचाच एक दुष्परिणाम म्हणजे जाडे लोक कधीच वजन कमी व्हावे म्हणून प्रयत्न करत नाहीत. त्या पेक्षा जरा तंग कपडे घातले तर आपल्या वाढत्या वजनाची काळजी वाटून माणूस जरा आकारात येण्याचा प्रामाणिक प्रयत्न तरी करेन. वजन जास्ती असणे याचा मला प्रॉब्लेम नाही पण सुस्त झालेले आणि कंटाळा आलेले चेहेरे मला नकोसे वाटतात.

तुम्ही जेव्हा स्वतःची  काहीच काळजी न घेता दुसर्‍या समोर जाता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तिला अप्रत्यक्षपणे तुझी लायकी  असलाच भिकार माल मिळण्याची आहे असे इम्प्रेशन देता. नकळत का होईना त्याचा अपमान करता . तुमचे नीट आणि स्वच्छ असणे समोरच्याला मान देण्यासारखेच आहे हे लक्षात ठेवा .

एक मात्र आहे की हे 'दिसणे' वरवरचे आहे . एखाद्या कॅज्युअल संभोगासाठी हे असे दिसणे नटणे  मुरडणे ठीक आहे. त्याचा परिणामही लगेच दिसतो. पण दीर्घकालीन संबंध हवे असतील तर माणूस त्याच्या गुणांमुळे जास्ती प्रिय वाटायला लागतो. तेजसचे रॉनच्या बाबतीत हेच झाले. माणूस आवडला की त्याचे सगळे आवडते. खर्‍या मित्राचे हेच तर लक्षण आहे. आपण जसे आहोत तसे आवडले पाहिजे . 

अर्थात याचा अर्थ असा नाही की वर सांगितलेल्या गोष्टींपैकी काहीच करायचे नाही. माणसाने कायम लक्षात ठेवले पाहिजे की संभोग हा जीवनाचा काही क्षणांपुरता आनंद देणारा हिस्सा आहे. दिवसातला बाकीचा मोठा वेळ त्या माणसाशी बोलण्यात , जुळवून घेण्यात, त्याला समजून घेण्यात जात असतो. आणि हाच काळ जास्ती आनंददायी असतो. पती पत्नीचे आयुष्य असो कि समलिंगी मित्रांसह घालवत असणारा वेळ असो, दुसऱ्याला समजून घेणे , त्याच्याशी प्रेमाने राहणे यासाठी वर्तणूक आणि अंगातले गुण , समजूतदारपणा हेच जास्ती महत्वाचे  ठरते . 

मला विचाराल तर खरा दागिना म्हणजे चेहर्‍यावर  असलेला जीवनाचा आनंद घेण्याचा उत्साह, बोलके  डोळे. खरा गुण म्हणजे माणसाकडे दुसर्‍याला आनंद देण्याचा मोठेपणा असला पाहिजे.आपले हात  मैत्री करण्यासाठी पुढे पाहिजे तर मित्राला वाचवण्यासाठी तो उगारलेला असला पाहिजे. खर्‍या मित्रासाठी आपली जान हाजिर आहे. आपला देह तर क्षुल्लक गोष्ट आहे.

आयुष्यात चांगला पार्टनर हवा असेल तर तुम्हीही चांगला माणूस होणे आवश्यक आहे. नाही का ?


अनिमेष बरोबर ट्रेकिंग 
वा-सोट्या वर चढाई 

तेजसचं सेक्स टॉय
टेडी बेअर

गर्ल फ्रेंड समोर पुष्करला पटवले
तेरा यार हू मै

10 comments:

  1. Mast mitra. Love you yaar.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Dear. I hope this is useful for many of us.

      Delete
  2. वा खूपच छान टिप्स ... तोंडाची दुर्गंधी हा फार मोठा दुर्गुण आहे लोक त्याबद्दल फारच बेफिकीर असतात ज्यांना चुंबन फार आवडते त्यांचा तर विरसच होतो पण मला डीओ म्हणजे सेंट ची अलर्जी आहे त्यामुळे काही वेळा पंचाईत होते अशावेळी मी भेटायला जायच्या आधी आंघोळ करतो पण कदाचित घामाचा वास येत असेल. उपाय काही आहे का त्यावर

    बिट्टू तू परत आलाय आता तिथले अनुभव शेअर करशील

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की शेअर करेन. जग फार सुंदर आहे आणि तिथली माणसे अजूनच सुंदर आहेत.

      Delete
  3. तोंडाची दुर्गंधी कशी तपासावी याची टीप दिल्याबद्दल आभार! अशाच hair removal, कपड्यांची निवड, underwear ची निवड यावरही लेख येऊ दे.

    ReplyDelete
    Replies
    1. या आणि अशा काही विषयांवर तुमचेही अनुभव शेअर करा प्लीज. आपण बर्‍याच लोकांनी आपापले अनुभव संगितले तर खरच उपयुक्त महितीचा खजिनाच होईल.

      Delete
  4. वाह खूप चांगल्या टिप्स दिल्या आहेत दिसायला जरी या साध्या गोष्टी वाटत असल्या तरी यामुळे बराच फरक पडतो. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व खुलून येते तसेच आत्मविश्वास देखील वाढतो. तेव्हा जीवनात वरील गोष्टीना भरपूर महत्व आहे. वरील माहिती खूप उदबोधक आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मित्रा. तुम्हाला यातल्या कशाचा उपयोग झाला तर मला फार आनंद होईल. हा लेख फेसबुकवर किंवा इतर सोशल साईट वर शेअर करायला विसरू नका.

      Delete
  5. Ekdam masta re...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अनामिक मित्रा.

      Delete

Followers