Copy Not Allowed

Tuesday, 15 May 2018

दहा हजार हिट्स ...केवळ तुमच्यामुळे

मित्रानो,

दोनच महिन्यापूर्वी सुरु केलेला हा ब्लॉग अल्पावधीत दहा हजार हिट्स मिळवून माझ्या साठी तरी हिट झालेला आहे. आणि या लोकप्रियतेला कारणीभूत असणाऱ्या तुमच्यासारख्या वाचकांना माझा सलाम. 

फेसबुकवर असणाऱ्या अनेक समलिंगी समूहातील सदस्यांनी या ब्लॉगची लोकप्रियता वाढवली. मी सुद्धा काही काळ येथे क्रियाशील होतो. पण काही असंतुष्ट घटकांनी रिपोर्ट करून माझा आय डी ब्लॉक केला किंवा नंतर काही चाहत्यांनी बनवलेले @chikanamulagafanclub हे पान बंद पाडले. पण तरीही तुम्ही वाचकांनी या ब्लॉगवर असणारी माया कमी केली नाही. 

मला फेसबुकवर या कथांची माहिती देता येत नसल्याने मी तुम्हालाच विनंती करतो आहे की तुमच्या मित्रांबरोबर या कथा शेअर करा. 

अनेक मित्र माझ्या मेल आय डी वर संपर्क साधत आहेत , काही शंका विचारात आहेत, लिखाणाबद्दल फीडबॅक देत आहेत या सगळ्याचा आनंद आहे. असा सरळ संपर्क साधता यावा हेच मलाही अपेक्षित होते. 

तेव्हा मित्रानो इथल्या गोष्टींची , लिखाणाची मजा घ्या. त्यातून काही नवीन शिकता आले तर शिका आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. 

माझा मेल आय डी आहे chikanamulaga at जीमेल डॉट कॉम

मनापासून धन्यवाद,

तुमचाच ,

चिकना मुलगा




8 comments:

  1. दहा हजार काय...हा आकडा पार होईल खूप लवकरच... अशाच अश्लील आणि चमचमीत कथा आम्हां वाचकांना देत रहा.
    दर शुक्रवार ची आतुरतेने वाट पाहत असतात बापुडे...

    ReplyDelete
  2. मस्त आणि सेक्सी आहेत तुझे अनुभव

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, अनुभव आणि कवी कल्पना यात फरक तर असणारच...अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

      Delete
  3. Love you Chikna

    ReplyDelete
  4. महिनाभरात आपण दहा वरून वीस हजार हिट्स वर पोहोचलो...तुम्हा सर्वांचे आभार !!!

    ReplyDelete
  5. यिप्पी..... केवळ तुमचे प्रेम ...कल रात्री आपण 40 हजार हिट्स पार केल्या . ब्लोगवरचा आकडा वाचून काही वाचकांनी अभिनंदनाच्या मेल सुद्धा केल्या आहेत. त्यांचे आभार....तुमचे सर्वांचेही आभार जे दर शुक्रवारी सकाळी सकाळी ब्लॉगवर अक्षरशः 'चढतात' ... लव्ह यू ऑल.. हे प्रेम असेच राहू द्या.... प्रत्येक पोस्ट खाली शेरिंग साथी बटणं आहेत. तुम्ही या गोष्टी शेअर करू शकता. काही गोष्टींना मी पी डी एफ मध्येही ठेवले आहे . त्या गोष्टी डाउन लोड करून संग्रही ठेवू शकता.
    बाजूलाच तुमचं ईमेल आय डी देण्यासाठी सोय आहे. मी ब्लॉग लिहिला की तुमच्या मेलवर लगेच त्याचे नोटिफिकेशन येईल.
    तुमच्याशी संपर्क असाच राहावा ही इच्छा
    तुमचाच,
    बिट्टु

    ReplyDelete

Followers