#marathigay मामाला वरून ओला कच्च आणि उघडा पाहताना मला जास्ती मजा वाटत होती. खूप वेळा बोलवूनहि मी पाण्यात उतरत नसल्यामुळे शेवटी मामा वर चढून आला
विकी भल्ला याचा पहिला अनुभव तर तुम्ही लोकांनी एकदम हिट केलात...आज आहे त्याचा पुढचा भाग. विकी अजून लिहिणार का याची मला माहिती नाही . त्यामुळे मी विकीची कथा संपूर्ण झाली असे म्हणू शकत नाही. विकीशी संपर्क साधायचा असेल तर viky.bhalla69@gmail.com या मेल अॅड्रेस वर संपर्क साधता येईल.
विकी भल्ला याचा पहिला अनुभव तर तुम्ही लोकांनी एकदम हिट केलात...आज आहे त्याचा पुढचा भाग. विकी अजून लिहिणार का याची मला माहिती नाही . त्यामुळे मी विकीची कथा संपूर्ण झाली असे म्हणू शकत नाही. विकीशी संपर्क साधायचा असेल तर viky.bhalla69@gmail.com या मेल अॅड्रेस वर संपर्क साधता येईल.
===================================================
बारावीच्या परीक्षा झाल्या. माझी सी ई टी पण एकदम भारी होऊन मला एका उत्तम इंजिनियरिंग कॉलेजमध्ये अॅडमिशन पण मिळाली. वासीम आणि त्याच्या हलकट गॅंगचा त्रास संपला. मी नव्या कॉलेजमध्ये एंजॉय करू लागलो. हॉस्टलचे दिवस होते. नव्या हॉस्टलची गम्मत वेगळी . आकाशातले मुक्त पक्षी झालो होतो.
सुट्ट्या आल्या तशी घरी जाण्याची ओढ वाटू लागली. घरी जाण्याचे अजून एक कारण होते ते म्हणजे माझ्या आजोळी होणारे एक लग्न. आईच्या नात्यात असणार्या एका बहिणीचे लग्न होते पण ती आईसाठी जवळची होती. मला तर जायचंच होतं .... आजोळचे लाड कुणाला आवडत नाहीत ?
माझे आजोळ म्हणजे एक मोठं खटलं होतं . माझी आई सर्वात मोठी मुलगी. तिच्या नंतर तीन बहिणी आणि मग अगदी उशिराने झालेला माझा मामा. चार मुलींच्यानंतर जन्माला आलेला म्हणून मामाचे सर्वच जण खूप लाड करायचे. तसा माझ्या आणि त्याच्या वयात अगदी आठ नऊ वर्षांचाच फरक होता .
यावेळी, मोठा झाल्यामुळे, मी गावी एकटाच जाणार होतो. आई मला तिथे गेल्यावर कसे राहायचे कसा आब राखून वावरायचे याच्या सतराशे साठ सूचना देत होती. मी ऐकल्यासारखे दाखवत , हो हो करत मान डोलवत होतो. तिलाही आणि मलाही माहिती होते की सगळे पालथ्या घड्यावर पाणी आहे.
बोलता बोलता आई बोलून गेली की आता मामासाठी मुली बघायला सुरुवात करायची आहे.
मी म्हणालो,” मामा तर अजून लहानच आहे की. आता तर कुठे नोकरीला लागलाय. आताच कुठे त्याला कटकट करता लग्नाची?”
“आताच कसली , चांगली दोन वर्षे झाली की नोकरी लागून . आणि आता अंगाने पण भरलाय. पूर्वी कसा पोरगेलासा होता आता अगदी लग्नाचा दिसतो,” आई कौतुकाने बोलत होती.
दुपारी शेजारच्या काकू आल्या तर त्यांनाही तिने तीच टेप लावली. त्याचा फोटो दाखवून कुणी मुलगी असेल तर सांगा म्हणून त्यांना गळ घालत होती.
“हो हो अगदी राजबिंडा आहे माझा भाऊ , “ आईच्या तोंडून भावाचे कौतुक काही थांबत नव्हते,” आता बघायला सुरवात केली म्हणजे मुलगी पसंत पडून लग्न ठरेपर्यन्त एक दोन वर्षं तर जातीलच की....” आई आताच स्वप्ने बघू लागली होती.
मामा एवढा बदलला असेल का ? माझ्याही मनात कुतूहल निर्माण झाले. मी दहावी बारावीच्या चक्करमध्ये दोन तीन वर्षे आजोळी गेलोच नव्हतो. त्यामुळे मामाला मी एवढ्यात पहिले नव्हते. आई आणि बाबा काही ना काही कारणामुळे गावी जाऊन यायचे पण मला मात्र जाता आले नव्हते त्याची भरपाई मी या सुट्टी मध्ये करणार होतो.
मामाचीही तशी नवी नोकरी होती त्यामुळे त्यालाही आमच्याकडे येणे जमले नव्हते. पंधरा एक वर्षांपूर्वी आतासारखे व्हिडीओ कॉल , व्हाट्स अॅप , फेसबुक असले काही प्रकार नव्हते त्यामुळे कुणाचे काय चालू आहे हे कळायला मार्ग म्हणजे पत्र किंवा लँड लाइन .
आता जसं बायकोने गरम भात केलाय म्हणून लोक इनस्टावर स्टोरी टाकून जगाला सांगतात तसा काही प्रकार पूर्वी नव्हता.
रात्री झोपताना आईने बाबांशी परत याच विषयावर बोलणे सुरू केले. बाबांचे कलीग्ज आणि त्यांच्याकडे असणार्या विवाह योग्य मुली....रात्री मामाचा विचार करत करत झोपी गेलो.
आजोळी एकट्याने जाण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे बाबा मला रेल्वे स्टेशनवर सोडायला आले होते. आधी ट्रेन , मग बस , मग वडाप असे सगळे धंदे करत मी संध्याकाळी उशिरा पोहोचलो.
माझे आजोळ मराठवाड्यातल्या नांदेड जवळ, तसा दुर्गम म्हणावं अश्या भागात आहे. जाण्याच्या फारश्या सोयी नाहीत.. आजोबांची शेती असल्याने त्यांनी कधी दुसरीकडे स्थायिक होण्याचा विचार केला नाही.
माझ्या मामाने जवळच असणार्या तालुक्याच्या गावी शिक्षण पूर्ण केले आणि तिथेच एका संस्थेत लेक्चररची नोकरी मिळवली. खेड्यातलया सगळ्या मुलांना असतो तसा त्यालाही स्पर्धा परीक्षा देण्याचा किडा चावला होताच पण त्याचा हा अभ्यास नोकरी सांभाळून चालला होता. मामाचा जन्म बर्याच उशिरा झाल्यामुळे तो तरुण झाला तेव्हा आजोबांचे वय झाले होते. मामाला शेतात राबण्याची सवय त्यामुळेच लागली होती.
मामा शिक्षण आणि नोकरीसाठी तालुक्याच्या गावी रहायचा पण शेतीची कामे करण्यासाठी दर शनिवार रविवार गावी यायचा. मामाचे शिक्षण किंवा काम हे कधी शेतीच्या आड आले नाही म्हणून आजी आजोबासुद्धा खुश असायचे. बहिणींना तर यामुळे भावाचे फारच कौतुक.
बर्याच दिवसानी नातू , म्हणजे मी , येणार म्हणून आजी आजोबा पण खुश होते. घरी गेल्यावर मामा पण मला बघून एकदम आनंदी झाला. घराची हाल हवाल , आई बाबांची विचारपूस अश्या गप्पा सुरू झाल्या. मी मामाकडे बघत होतो.
मामाची प्रत्येक हालचाल एकदम डौलदार होती. हालचालीत एक अदब होती, ग्रेस होती. मी मामाकडे जसा लक्ष देऊन पाहू लागलो तसा मला तो अजूनच आवडायला लागला. मी पण मोठा होऊन तसाच वागणार, तशीच बॉडी बनवणार असं काहीसं माझ्या मनात येऊ लागले.
कदाचित तोच तो क्षण होता जेव्हा माझ्या मनात कुणा पुरुषाचे आकर्षण निर्माण होत होते. त्याच वेळी माझ्या मनाचा काटा रतीऐवजी मदनाकडे झुकला. अर्थातच त्या वेळी हे असले काहीच कळत नव्हते.
सव्वीस सत्तावीस वर्षांचा , सावळा पण तजेलदार तुकतुकीत त्वचा , डोक्यावरचे, भरपूर काळे कुळकुळीत केस, शेतात कष्ट करून कणखर झालेले हात, मजबूत खांदे , चरबीचा एकही कण नसलेले सपाट पोट, माझ्याहून थोडासा उंच ...म्हणजे पावणेसहा फुट तरी असावा असा माझा मामा मुंबई, पुण्यात असता तर मॉडेल म्हणून कुठेही खपून गेला असता.
थॅंक्स फ्रॉम इंटरनेट |
तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण झाल्यामुळे त्याच्या वागण्या बोलण्यात एक सफाई आलेली होती. मामा अगदी गावठी रांगडा नव्हता किंवा अगदी शहरी पुचाट पण नव्हता. दोन्ही जगांचा सुवर्णमध्य साधलेला मामा, मला आईने केलेल्या वर्णनापेक्षा फारच भावला होता. त्याच्या प्रत्येक हालचालीत तो मला अधिकच मादक , दिलखेचक वाटत होता.
त्या दिवशी प्रवासामुळे मी खूपच दामलो होतो. संध्याकाळी लवकर जेवून कधी झोप लागली ते सुद्धा कळले नाही.
सकाळी उठून चहा पित असताना आजीला विचारले,” मामा कुठे आहे? दिसत नाही . बाहेर गेला का एवढ्या सकाळी?”
“अरे रात्रीच शेतावर गेलाय. आजकाल उसाला पाणी द्यायला लागतंय . दिवसा तर एमेसीबी ची वाट लागलेली असते. रात्रीच लाइट येती. मग तो रात्री मोटर चालू करतो आणि तिकडंच झोपतो. ईलच आता थोड्या वेळात,” आजीने सांगितले,” तसंबी त्याच्या कॉलेजला सुट्टीच हाये ...राहील काही दिवस हिकडं.”
आजीचे बोलणे ऐकून मी खुश झालो. मी सुद्धा आठ पंधरा दिवस राहणारच होतो. त्यात मामा असेल तर मज्जा करता येईल . लहानपणापासून गावी जात असल्याने आजूबाजूच्या गल्लीतले समवयस्क मित्र भरपूर होते. साधारण माझ्याच वयाचे. मारुतीच्या पारावर, तालमीत , विहिरीवर, घाटावर असे आमचे भेटण्याचे अड्डे होते. दिवसभर त्यांच्या बरोबर हुंदडण्यात गेला.
रात्री जेवणाच्या वेळी मामा भेटला. तो जेवून शेतावर जाणार होता. मी सुद्धा तुझ्या बरोबर शेतावर येतो असे म्हणून मी त्याच्या मागे लागलो. पण आजोबा आणि मामा अनेक कारणे सांगू लागले. शेतात रात्री साप निघतात, पाणी सोडल्याने खूप थंडी वाजते, रात्र भर काम चालू असते तुझी झोपमोड होईल एक न दोन. मी फुरंगटून झोपी गेलो. आजी आजोबा माझा राग पाहून हसत होते. आणि त्यांचे हसणे ऐकून मी अजूनच चिडत होतो.
दुसर्या दिवशी मी पहाटेच उठलो आणि शेतावर निघालो . आजीने का जातो कशाला जातो असे चालू केले.
मी रागातच होतो, » मी आता तुमचं काहीही ऐकणार नाही. मी आताच जाणार शेतावर.” मी निक्षून सांगितले.
“विकास , शेजारच्या पिंट्याला घेऊन जा. तुला एवढ्या सकाळी रस्ता कळणार नाही. आणि थोडी भाकरी चहा घेऊन जा. तिकडं काय हाटीलं सापडायची नाय. आणि दुपार व्हायच्या आत मामाबरोबर गप घरला या. उधळू नका . “ आजीने प्रेमाने पण कडक शब्दात सूचना दिल्या. दुनिया मला विक्या , विकी म्हणते पण आजी मला ‘विकास’ अशीच हाक मारायची.
पिंट्या माझ्याहून थोडा लहान होता. त्याची सायकल घेऊन आम्ही शेतावर निघालो. सकाळचे सात साडेसात झाले असतील.
विहिरीवर मोटार चालू होती. बाजूला एक आंब्याचे झाड आणि त्या सावलीत कच्चे बांधकाम असलेली एक छोटीशी खोली . या खोलीत लागणारी हत्यारे, मोटारचे साहित्य, एक छोटी चूल , दोन चार भांडी कुंडी, पाण्याचा माठ असा सगळा सरंजाम होता. कुणाला रहावे लागले, काही स्वयंपाक करायचा झाला तर ही सोय. भिंतीवरचा आरसा , कंगवा, पॅरॅशूट तेलाची बाटली ही खास मामाने केलेली सोय होती.
मी गेलो तर मामा बाजेवर मस्त गोधडी पांघरून झोपलेला होता. मी जाऊन त्याची गोधडी खेचली. मामा जरासा चिडला. पण जसे त्याने डोळे उघडले तसे मला पाहून तो चकित झाला. त्याने आमची विचारपूस केली. तो पलंगावरून उठला . त्याच्या अंगात एक बनियन आणि अंडरपॅंट होती. उठून त्याने पांघरूणात शोधून टॉवेल बाहेर काढला आणि कमरेभोवती लुंगीसारखा गुंडाळला. तेवढ्या वेळात त्याच्या अंडर पॅंट मध्ये फुगलेला भाग माझ्या नजरेस पडला.
आम्ही बाहेर आलो. त्याने जवळच्या एका लिंबाच्या झाडाची काडी तोडली आणि तो दात घासू लागला. इकडे झाडावर चढणे, दगड मारून आंबे तोडणे, गुरांशी खेळणे, बैलगाडी ढकलणे असले माकडचाळे आम्ही करू लागलो. मामाने चूल पेटवून चहा टाकला आणि गुरांना चारा घातला. मामाने आवाज दिला तसे शेजारच्या शेतातून त्याचे दोघे तिघे मित्र आले.
मामाने सर्वांना चहा दिला . चहा पितापिता सर्वांच्या विहिरीवर पोहायला जाण्याच्या गप्पा सुरू झाल्या. चहा संपवून सगळे विहीरीकडे गेले. सर्वांनी कपडे काढले आणि पोहायला खाली पाण्यात उतरले. सैराट मध्ये दाखवली आहे तशीच पायर्या असलेली विहीर आमच्या शेतात आहे. सर्व जण पोहू लागले. मला पोहता येत नसल्याने मी बाजूला काठावर बसलो होतो.
सर्वांनी मला बोलवायला सुरुवात केली. माझी हिम्मत होत नव्हती. मामाही सारखा पाण्यात बोलावत होता. पण माझी फाटली होती. मामाला वरून ओला कच्च आणि उघडा पाहताना मला जास्ती मजा वाटत होती. खूप वेळा बोलवूनहि मी पाण्यात उतरत नसल्यामुळे शेवटी मामा वर चढून आला . त्याच्या ओल्या चड्डीत त्याचे सामान अजूनच फुललेले वाटत होते. त्या चिपकलेल्या चड्डीमुळे तो उठाव अगदी स्पष्ट दिसत होता.
पोहायला येत नसेल तर जी भीती वाटते तीच मलाही वाटत होती. पण मामाने माझी हर तर्हेने समजूत काढली. मी धरतो तुला, बुडू देणार नाही, कधी तरी तर शिकावेच लागेल ना , मग आजच शिकायला सुरुवात कर, कॉलेजच्या ट्रीप मध्ये काय असा बसणार का ? मामाने हजार अर्ग्युमेंट करून शेवटी मला पाण्यात उतरवलेच.
मामा मला पकडून पोहायला शिकवत होता. आणि माझे लक्ष शिकण्याकडे कमी आणि मामाकडे जास्ती होते. बाकीचे सर्व जण मला प्रोत्साहन देत होते. मामाने त्याच्या हातांच्या तळव्यावर माझे पोट धरले आणि मला पाय कसे मारायचे ते सांगू लागला. सर्वांच्या सूचना ऐकून मला थोड्याच वेळात हात पाय कसे मारायचे ते जमू लागले आणि मजा येऊ लागली.
मामाचा स्पर्श मला सुखद वाटत होता. अधून मधून मी मुद्दाम जाऊन मामाला चिटकायचो. त्या झटापटीत एक दोन वेळा माझा स्पर्श मामाच्या लवड्याला पण झाला. तो ताठवा जाणवला ... ती गरमी पाण्यात सुद्धा जाणवली. तास दीड तास असा धुडगूस घालून आम्ही पाण्यातून बाहेर पडलो. कपडे घातले आणि पिंट्याच्या सायकलवर बसून घरी परतलो.
दुपारी झोप झाल्यावर मित्रांसोबत टाइमपास केला आणि जशी संध्याकाळ होऊ लागली तसे मला शेतावर जाण्याचे वेध लागले. आज पण मी हट्ट सुरू केला शेवटी आजी, आजोबा नमले आणि त्यांनी मला मामासोबत जाण्याची परवानगी दिली.
मामाच्या बाइकवर बसून आम्ही शेतावर पोहोचलो. आमच्या बर्याच गप्पा चालू होत्या. मी शाळेतले आणि कॉलेजमधले किस्से मामाला सांगत होतो. आमच्या गाडीचा आवाज ऐकून मामाचे सकाळचे मित्र शेतावर आले. त्यांच्या जेवणाचे डबे त्यांच्या घरच्या लोकांनी आमच्यासोबत पाठवले होते.
बाजूला रेडियोवर आकाशवाणी सुरू करून आमच्या गप्पा आणि जेवण चालू झाले. जेवताना गप्पांचा फड रंगला. खेड्यापाड्यात लोकांना गप्पा मारणे हाच विरंगुळा असतो. जंगलात होणार्या चकव्याच्या , वेताळच्या पालखीच्या, हाकामारीच्या आणि भूतखेतांच्या किश्श्यांना उत आला.
बाप रे हे लोक इतक्या मन लावून गोष्टी सांगत होते की जसे काही यांच्यासमोरच सगळे घडले होते. मिट्ट काळोख पडला होता. सर्वांची जेवणे झाली. थोडावेळ बसून मामाचे मित्र आपआपल्या शेतात गेले. मामासुद्धा मला म्हणाला की तू झोप , मी मोटर चालू करून पाणी देऊन येतो.
मोटर चालू करणे दोन मिनिटांचे काम असले तरी शेतातून पाणी खेळवावे लागते. काल कुठल्या खाचरांना पाणी दिले ते टाळावे लागतात आणि नव्या खाचरांच्या बाजूने पाण्याचा प्रवाह वळवावा लागतो. शेतकरी आपल्या शेताला तळहातावरच्या रेषांप्रमाणे ओळखत असतो. त्यालाच हे काम अंधारात जमू शकतो.
मी खोलीत पलंगावर पडलो. वर एक रेडियो होता. तो लावला. खरखर वाजत होता. म्हणून थोड्या वेळाने बंद केला. आत फक्त मी , खोलीतला चाळीसचा मिणमिणता बल्ब , आंब्याची सळसळ , बाहेर मिट्ट काळोख आणि दूरवर ओरडणारी कोल्ही कुत्री. मी तसाच मामाची वाट पाहत पडून राहिलो.
जवळपास तासभराने मामा आला. त्याने आल्यावर फावडे बाजूला ठेवले. टॉर्च लटकावून ठेवला. चिखलाने माखलेले हात पाय धुतले.
“बघ तुला सांगत नव्हतो की शेतावर मजा येण्यासारखं काही नसतं “मामा म्हणाला.
मी त्याला चिडवत म्हणालो,” मला तर फार मज्जा येते आहे. रोज येईन तुझ्याबरोबर शेतावर झोपायला . आम्हाला शहरात कुठून असली मजा येणार ?”
“कठीण आहे तुझं ,” मामा वैतागून बोलला,” इथे रात्री भूक लागली तर खायला सुद्धा काही मिळणार नाही. तुला काही लागणार असेल तर उद्यापासून बरोबर घेऊन येत जा. आईला डब्यात चिवडा किंवा शंकरपाळे द्यायला सांगतो. “
“जो हुकूम मेरे मामा,” मी लाडात येत त्याला बोललो.
मामा काही तरी आठवून उठला आणि बाहेर जाऊन त्याने जनावरांसमोर वैरण टाकली, पाण्याची बदली भरून ठेवली. आत येऊन त्याने अंगावरचे कपडे काढले
“विक्या, रात्रीत दोन तीन वेळा उठावं लागेल मला, पाण्याची वाट बादलायला लागंल. रान भिजवायचं म्हंजी काई सोप्पं काम न्हाई गड्या.”
बोलता बोलता त्याने दिवा विझवला आणि माझ्या बाजूला येऊन पडला. “झोप तू गड्या , मी पण झोपतो. तेवढीच दोन तास झोप होऊन जाईल. “ मामा बोलला.
मामाने रेडियो ट्यून केला होता. विविधभारतीवर रात्रीची लता आणि किशोरची गाणी चालू होती. एकाच बाजेवर दोघांनी झोपणे अवघड असते. एकाच्या वजनाने बाज मध्यभागी खाली जाते.
“मामा, जागा पुरत नाहीये,” मी कुरकुरलो.
“तुला सांगत व्हतो...घरीच झोप म्हणून... हिथं झोपण्यात काय मजा नाय....तर तुला पटंना..सरक जरा हिकडं ,” असं म्हणून मामा जरा बाजूला सरकला. मी मामाच्या अगदी जवळ आलो.
“मामा, तुझे मित्र त्या भूतांच्या गोष्टी सांगतात त्या खर्या होत्या का रे?” मी विचारले.
“हम्म ... या भागात अनेक वर्ष असे अनुभव सांगताना लोकांना ऐकले आहे मी,” मामा म्हणाला.
“मामा, चिडवू नकोस मला, माझी फाटते असे काही ऐकून,” मी चिडक्या स्वरात म्हणालो...
“ ओहोहो.... मला वाटलं आमच्या विक्या आता मोठा झाला… तर कसलं काय ...अजून भित्री भागू बाईच आहे की,” मामा खेळकर आवाजात म्हणाला.
“ नको ना रे चिडवू...” मी म्हणालो.
“ भीती वाटते का ? ये माझ्या कुशीत,” मामा म्हणाला आणि त्याने त्याचा हात डोक्याखाली घेऊन पिळदार दंडा वर डोके ठेवण्यासाठी मला जागा दिली. मी त्याच्या बेटकुळया असलेल्या त्या दंडावर समाधानाने डोके ठेवले.
माझ्या बाजूला मराठी पौरुषाचे जिवंत प्रतीक असलेला , सह्याद्रीच्या कातळासारखा मजबूत असा माझा मामा झोपला होता. त्याच्या मनात काय असेल आता ? मी आढ्याकडे बघत विचार करत होतो.
मामाच्या मिठीत कसे वाटेल? त्याच्या दणकट बाहुपाशात जाणारी कुठलीही मुलगी स्वर्गसुखाच्या झोक्यावर झुलेल . मी जाऊ शकेन का तिथे....त्या स्वर्गसुखात ? तो माझा मामा आहे ....तो काय म्हणेल?
कदाचित मी जागा असल्याचे मामाला समजले. त्याने गोधडी दोघांच्या अंगावर घेतली.
“विक्या, खाली झोपलो असतो रे, पण इथे विंचू काट्याची भीती असते. तू झोप निवांत. “ मामा म्हणाला.
मी मामाच्या भरदार छातीवर हात ठेवला . माझे तोंड आता त्याच्या काखेपाशी होते. त्याच्या काखेतल्या घामाचा तो उग्र सुगंध मला वेडे करत होता. माझा लंड खाली चड्डीत फुल्ल ताठला होता. पण मामाला टोचू नये म्हणून मी प्रयत्नाची पराकाष्ठा करत होतो.
आजही त्याने अंडरपॅंटवर टॉवेल गुंडाळला असेल आणि रात्रीत तो टॉवेल सुटूही शकेल. मग सकाळी मला जसे त्याचे जोरदार सामान दिसले होते तसे दिसेल का? की रात्रीच काही किडे करून त्याचे सामान उघडे करू ? ताठून ताठून माझा लंड दुखायला लागला होता.
माझ्या मनात आतापर्यंत झालेल्या प्रसंगांनी पिंगा धरला. लॅबमध्ये झालेला तो स्पर्श, एन सी सी च्या कॅम्प मध्ये घडलेला तो प्रसंग, माझ्या चुलत भावांसोबत केलेली लंड मस्ती, माझी बायल्या म्हणून त्या वासीम आणि फालतू मुलांनी केलेली बदनामी.,.. सगळं सगळं समोर आलं.
जर मी मामा बरोबर असा वागलो असतो आणि त्याला आवडले नसते तर? त्याने आई बाबांना सांगितले असते तर ? मी माझ्या लाडक्या मामाला कामाचा मुकलो असतो तर ? माझ्या मनात द्वंद्व चालू होते. काय करावे काळात नव्हते. ही मदनाची बाधा रोखून धारावी की उफाळू द्यावी याचा निर्णय होत नव्हता.
मी हळूच डोळे किलकिले करून मामाकडे बघत होतो. लयबध्द पणे वर खाली होणारी त्याची छाती , शांतसा चेहरा मला अजूनच नाद खुळा बनवत होता. माझ्या मनात उठलेलं हे तूफान त्याला समजेल का? त्याच्या मनातही असंच काही येत असेल का
हिम्मत आणि इच्छा यांची माझ्या मनात चालू असलेली रस्सीखेच संपत नव्हती.... काय करावे याचा निर्णय होत नव्हता .तोच रेडिओवर लताबाईंचे गाणे सुरू झाले.....
लग जा गले की फिरसे यह हसीन रात हो ना हो.......
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो
(अपूर्ण ? )
एक फसलेली कहाणी वाचायची आहे?
त्याच्या सख्या आतेभावाला पटवताना बिट्टूची काय अवस्था झाली?
- या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
- अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
- प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे ही आवश्यक बाब समजावी .
Dear बिट्टू ,
ReplyDeleteThank You , खूप छान लिहिलं आहेस. परत मला त्या शेतात जाऊन ते क्षण जगल्यासारखं वाटलं .
तुझे परत खूप खूप आभार, माझी कहाणी जगा पर्यंत पोचवल्या बद्दल .
तुझाच,
विकी
मित्रा , तुझ्या मनातली खळबळ , तुझ्या भावना इतक्या सुंदर प्रकारे मांडल्यास की बस....आता ही गोष्ट पूर्ण करायचं मनावर घे. मी मुद्दाम अपूर्ण असे लिहून प्रश्नचिन्ह टाकले आहे :)
Deleteतुझा ,
बिट्टू
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा ,,,,अशी अवस्था झालीय ,,,, भन्नाट रान वारा ,,,,लय भारी बिट्टू ....
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeletechukun delete zali hi comment.
Deleteआपण जे लिहिता ते एकदम मस्त असते. आपल्या समोर प्रत्यक्ष घडत आहे वाटते.����
ReplyDeletedhanyawad mitra.
Deleteप्रत्येक शुक्रवारी पुढील भाग प्रसारित करावा ही नम्र विनंती.
ReplyDelete:) tuzi utsukta lakshat yete aahe pan nailaj aahe.
Deleteho yar pudcha bhag lavkar prasarit kara
ReplyDeleteतुमच्या या अश्या आतुर कॉमेंट मला लिहायला लावतात.
Deleteबिट्टू,
ReplyDeleteमागच्या शुक्रवारी याच्या पुढच्या भागाची वाट पाहत होतो. या शुक्रवारी तरी भाग टाक ना यार!
पुढे काय झालं असेल याची उत्सुकता लागून राहिलीय.
rahul bhai.... pudhacha bhaag udya prasiddh karnar . nakki feedback de.
Deleteभावा टाकला रे पुढचा भाग...नक्की वाच आणि अभिप्राय दे.
Deleteहो ना यार मी तर दररोज वेळोवेळी चेक करतोय.
ReplyDeleteBittu Aur Viky, doghannahi salute (hatane bar ka). Gawakadchi an shetawarchi majja kahi aur ach aste he SITYt rahnharya launde poranna kay kalnhar? Panh tumchya lekhnhitun tya majech khar-khur warnhan kelat.
ReplyDeleteAta ratri kay ghadnhaar? Wasim cha rahilela sang Mama barobar pura karta yenhar ka mahi...............khupach tention alay mala.
Thnx to both of you