मित्रांनो, आपल्या स्वप्नील सातारकरला तुम्ही त्याच्या डोळे हे जुल्मी गडे या कथेमुळे ओळखताच . स्वप्नीलच्या आयुष्यात त्या प्रवासामुळे माजलेली खळबळ कधीच कमी झाली नाही. त्या अस्वस्थ करणार्या काळात अनेक गोष्टी घडत होत्या. स्वप्नील आपल्याबरोबर त्या शेअर करत आहे. कथेचे लेखन पुर्णपणे स्वप्नीलने केले आहे. स्वप्नीलला तुमचा अभिप्राय कळवायचा असल्यास satarkar.swapnil79@gmail.com या मेल आयडीवर लिहा. तुमची अशी काही कहाणी असेल तर मला सांगा chikanamulaga at gmail.com वर मेल करा . या कथेचे पूर्वीचे भाग खालील लिंक्स वर वाचायला मिळतील
त्याने अलगद माझ्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि मी देहभान विसरून त्याच्या मखमली मिठीत विरघळुन गेलो. चुंबनाची एकेक आवर्तनं सुरू होती. तो माझ्या सर्व अंगावर हात फिरवत होता. मधुनच दोन्ही हाताने माझा चेहरा धरुन माझ्या डोळ्यात पाहून पुन्हा चुंबनांचा वर्षाव करायचा.
मी बेडवर अंग टाकुन दिले व त्याच्या प्रेम वर्षावाने बेभान होऊन अलगद डोळे मिटून घेतले, आणि पडदा उघडुन रंगमंचावर नाटकाचा प्रयोग सुरू व्हावा तसं माझ्या डोळ्यांपुढे भुतकाळातील घटनांचा खेळ सुरू झाला. दिल्लीहून परत आल्या नंतरच्या एकेक घटना माझ्या नजरेसमोर फेर धरून नाचू लागल्या. आणि मी त्याच्या मिठीतुन भुतकाळात शिरलो………..
********************************
………..राजधानी एक्स्प्रेस माझ्या डोळ्यांपुढे धावू लागली. सर्व प्रवास, त्यात घडलेल्या घटना क्षणात आठवल्या आणि अंगावर काटा आणी रोमांच दोन्ही उभे राहिले. दिल्लीहून परत येत असताना सिमरजितची वाट पाहुन माझी कशी वाट लागली ते आठवले. ज्या प्रवासात मी माझे सर्वस्व गमावून बसलो होतो, आणि भाईंच्या नजरेत माझी किंमत घालवून बसलो होतो, त्याच्या समोर जाताना, त्यांच्याशी नजर मिळवताना मला मेल्याहून मेल्यासारखे होत होते, ते सगळं आठवलं. खरंतर तो प्रवास विसरण्यासारखा नव्हताच.
दिवाळी संपुन आता १०–१२ दिवस झाले होते. पण काॅलेजची सुट्टी अद्याप संपलेली नव्हती. एक महिना सुट्टी असल्याने अजुन किमान १०–१२ दिवस तरी काॅलेज सुरू होणार नव्हते. तरीही मी फारसा कुठे बाहेर जात नव्हतो. पण मी आणि सौरभ मात्र एकमेकांच्या सहवासात दिवस घालवत होतो.
दिल्लीहून परत येऊन ६ महीने उलटले होते तरी पण तिथे घडलेल्या घटना खुप ताज्या होत्या. परत आल्यावर बाबांनी घरी सिमरजितवरुन बराच तमाशा केला. एकंदरीतच दिल्लीत घडलेल्या सर्व प्रकारामुळे, झालेल्या फसवणुकीमुळे आणि घरातल्या बिघडलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे माझे मानसिक संतुलन काहीसं बिघडले होते.
मी आयुष्यात पहिल्यांदाच इतका निराश झालो होतो. पण भाईने माझी बाजू सांभाळली आणि सर्वतोपरी प्रयत्न करून मला या सगळ्या प्रकरणातुन बाहेर काढले होते आणि आईनं पण या कामी जमेल तेवढी साथ त्याला दिली. या काळात त्यांनी मला कधीच एकटं सोडलं नाही.
सगळ्यांच्या प्रयत्नाने मी खूप लवकर बरा होऊन माणसात आलो. मुळात मी सिमरजित मध्ये जास्त काळ गुंतलो नसल्याने मला प्रेमभंगाचं तेवढं दुःख नव्हतं, पण आपल्याला कोणीतरी फसवून आपला गैरफायदा घेतला याचं खुप दुःख होतं व त्यातूनच नैराश्य आले होते.
पुढे थोड्याच दिवसात बारावीचे निकाल जाहीर झाले. मी, सौरभ आणि आमची सगळी गॅंग पास झाली. मला चांगले मार्क्स मिळाले आणि मनाला आलेली मरगळ, नैराश्य सगळं कुठल्या कुठे पळून गेले. नवे काॅलेज, नविन ॲडमिशन नवे मित्र या सगळ्यात मी हरवून, गुंतून गेलो.
आपोआपच भुतकाळात घडलेल्या घटनांचा मला हळुहळु विसर पडू लागला. म्हणजे जाणिवपूर्वक मी सगळ्या गोष्टी ह्रदयाच्या तळाशी गाडुन टाकल्या. कारण माझ्यामुळे घरातल्या सगळ्यांना किती त्रास झाला हे मी समक्ष पाहिले होते.
मला आता कोणालाही आणखी त्रास द्यायचा नव्हता. म्हणुन मी स्वतःला इतर गोष्टीत गुंतवले. मला आणि सौरभला लॉ करायचं असल्यामुळे आम्ही बेंगलोरच्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. त्यामुळे आम्ही दोघे एकाच काॅलेजला होतो.
कॉलेज घरापासून लांब असल्याने आम्ही कधी बसने तर कधी बाईक वरून कॉलेजमध्ये जात असु. सौरभच्या खांद्यावर डोके टेकवताना किंवा त्याच्या मागे बसून त्याच्या मांड्यावर हात टेकवले की मला सिमरची प्रकर्षाने आठवण व्हायची. सिमरचा चेहरा मागे टाकून आयुष्याला सामोरा जात होतो. आमची हसी मजाक, नवे मित्र , पार्ट्या यात स्वतःला विसरू पाहत होतो. एकंदरीतच असेच मौजमजा मस्ती करत पाहिलं सेमिस्टर संपलं.
याच दरम्यान मी माझ्या प्रकरणातून बाहेर पडत असतानाच सौरभचा देखील प्रेमभंग झाला. म्हणजे ज्या मुलीला तो प्रपोज करणार होता, तीने याला नकार दिला. कारण तीचं दुसरीकडे अफेअर होतं. त्यामुळे सौरभला खुप दुःख झाले.
आम्ही दोघे समदुःखी जीव भावनिक पातळीवर एकत्र आलो. म्हणजे सतत दुःखी गाणी ऐकणे, प्रेम या विषयावर नकारात्मक चर्चा करणं हे आमचे उद्योग चालू असायचे. आम्ही सतत एकत्र राहू लागलो. कॉलेज व्यतिरिक्त इतर ही सगळीकडे आम्ही एकत्र असायचो. आम्हाला थोडावेळ सुद्धा एकमेकांच्या शिवाय करमत नसे, इतकी सवय झाली होती.
अर्थात आम्ही दोघांनीही एकमेकांना पुर्वीच्या सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या होत्या. पण म्हणतात ना “सहवासाने प्रेम वाढतं”, आमचं ही तसंच झालं. सतत सहवासात राहून दोघांनीही एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण झाले.
आम्ही एकमेकांच्या खुप जवळ आलो. अर्थात तशी कबुली अद्याप कोणीच दिली नसली तरी एकमेकांना सहवास आवडत होता. आमच्या बोलण्यातुन, वागण्यातुन एकमेकांच्या बद्दल वाटणारे प्रेम स्पष्ट जाणवत होते. तशी अप्रत्यक्ष हिंट दिली जात होती. सौरभ स्ट्रेट असुनही माझ्यात गुंतत चालला होता, हे मला जाणवत होते. कधी मूठ मारताना मी माझ्या मोबाईलवर असलेले सौरभचे फोटो उघडून मूठ मारायचो.तो माझ्या इंद्रियाना चोखून चोखून लाल करत आहे अश्या कल्पनेने मी गळायचो…. .
************************************
………… इकडे त्याने अलगद उचलून मला त्याच्या मांडीवर बसवले आणि मी जरासा भानावर आलो. तो माझ्या अंगातील टी शर्टाच्या आत हात घालुन तो अलगद माझे छातीवर हात फिरवत गळ्यावर, मानेवर किस करू लागला. त्याच धुंदीत मी पुन्हा जुन्या आठवणीत हरवून गेलो………..
***********************************
हल्ली मला बघुन सौरभ नेहमी एक गाणं मोबाईल वर लावत असे. “धडकन” सिनेमातील गाणं,
I am in Love, I am in Love
ना ना करते प्यार ओय मैं कर गया,
कर गया, कर गया
तुने किया क्या यार ओय मैं मर गया,
मर गया, मर गया….
ना ना करते प्यार ओय मैं कर गया…
मी एकदा त्याला विचारलं, “तू हे गाणं सारखं का लावतोस?”
तर हसुन हलकेच डोळा मारत म्हणाला , “मला हे गाणं खूप आवडते आणि मी हे गाणं माझ्या आवडत्या व्यक्तीसाठी लावतो.”
नंतर नंतर मी त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागलो. माझ्या हिंटला तो कधी उत्तर द्यायचा तर कधी आपल्याला काही कळलेच नाही असे दाखवायचा . कधी मला अचानक धक्का लागला किंवा नकळत हात लागतोय असे दाखवत चोळून पेटवायचा. सगळं माहीत असुनही मी मात्र त्याला काहीच रिस्पाॅन्स देत नव्हतो. कारण मला भाईची खुप भिती वाटत होती.
आतापर्यंत घडलेल्या सर्व प्रकारामुळे भाई माझ्या बाबतीत खूप हळवा झाला होता. मला कधी साधा ओरखडा सुध्दा उमटु नये म्हणून सतत जपणारा माझा भाऊ, पण त्याच्या स्वभावात एकप्रकारचा चिडचिडेपणा आला होता.
हल्ली तो काही कारण असो किंवा नसो, पण सतत माझ्यावर चिडत होता, रागावत होता. दिल्लीतील प्रकाराबाबत तो स्वतःला दोषी मानत होता. त्याने पुढाकार घेऊन मला दिल्लीला पाठवले नसते किंवा तो बरोबर आला नसता तर हे काही घडलंच नसतं, असं त्याला सतत वाटंत होतं. मला गरज असताना तो माझ्या बरोबर नव्हता याचं भाईला खुप दुःख होतं.
त्याच बरोबर भाईला सौरभचा ही खुप राग आला होता. सौरभदेखील या सगळ्यासाठी जबाबदार आहे असे भाईला वाटंत होतं. त्यामुळे हल्ली माझं सतत सौरभ बरोबर असणं भाईला बिलकुल आवडत नव्हते. तो सौरभला काही बोलत नव्हता पण मला मात्र भाई सतत रागावत असे आणि ओरडत असे. अशावेळी मी पुन्हा कुठल्याही प्रकरणात अडकणं भाईला बिलकुल सहन झाले नसते.
मी अजुनही भाईंच्या बेडरूममध्येच झोपत होतो. हल्ली रात्री अपरात्री कधीतरी शरीर बंड करून उठत असे. माझं नुकतंच तारुण्यात पदार्पण केलेलं उफाड्यातलं शरीर होतं अशा वेळी मला सिमरजितची आठवण येत असे. त्यावेळी शेजारी भाई असल्यामुळे मला काहीच करता येत नसे.
आता मात्र मी भाईला मिठी मारुन झोपणं बंद केले होते. माझ्या मिठीत आता पुर्वीचा निरागसपणा, निष्पापपणा राहीला नव्हता. झोपेत असताना नकळतपणे जरी माझा हात इकडे तिकडे सरकला किंवा घसरला असता तर मोठा अनर्थ घडला असता. त्याबद्दल मी स्वतःला माफ करु शकलो नसतो. म्हणूनच मी आता एकाच खोलीत पण वेगळा झोपत होतो.
या काळात मी जणू काही माझा सगळा आत्मविश्वास गमावला होता. माझ्या वागण्यातले असे अनेक बदल सगळ्यांनाच जाणवत होते, आणि त्यामुळे सगळ्यांची चिंता मात्र वाढली होती. पण भाईंच्या चिडचिडेपणा मुळे आई बाबा , माझा विषय काढत नव्हते.
************************************
………. मी या सगळ्या विचारचक्रात हरवून गेलो असतानाच इकडे बेडवर त्याने माझ्या पुर्ण शरीराचा ताबा घेतला होता. त्याने मला पुन्हा बेडवर झोपवले आणि तो माझ्यावर स्वार झाला. आणि हळूहळू दोघांच्याही अंगावरचा एकेक कपडा काढायला सुरुवात केली. डोळ्यांवर पुन्हा वासनेची नशा पसरली आणि मी परत भुतकाळात हरवलो…………
********************************
तर असेच दिवस पुढे सरकत होते. आणि दिल्लीहून परत येऊन आता सहा महिने होऊन गेले होते. कॉलेजची सुट्टी आता दहा–बारा दिवसात संपणार होती. अशातच मी आणि सौरभ, मानसिक पातळीवर खुप जवळ आलो होतो. अगदी स्विमिंग केल्यावर त्याच्या समोर कपडे फेडून बदलण्याइतका मी निवांत होतो. मित्रासमोर कसला आलाय संकोच ?
माझ्या अंगावर, माझ्या मांडीवर हात ठेवताना त्यालाही काही गैर वाटत नव्हते. कधी गर्दीत उभे असताना माझा हात त्याच्या “तिथे ” लागला तर तो मागे सरकत नव्हता. मग तो माझ्या गुंतत चालला होता का ? मी काय करावे याबद्दल मी गोंधळात होतो. नुकताच सिमरच्या आठवणीतून बाहेर पडत होतो. मग आता या नव्या गुंत्यामध्ये अडकायचे काय हा एक कळीचा प्रश्न होता.
एके दिवशी अगदी सकाळीच सौरभचा फोन आला. थोड्या गप्पा मारल्या आणि मग मला म्हणाला, “तुझ्यासाठी एक सरप्राइज आहे, आज दुपारी तुला ते समजेल.”
मी उत्सुकतेने पटकन विचारले “काय आहे?”
” अरे जरा दुपारपर्यंत वेट कर. इतकी का घाई झालीय तुला? सरप्राइज आहे, तर ते मी आता कसं सांगू?. पण एकच सांगतो तु त्याची कधी कल्पना ही केली नसशील. मी कॉल करतो, आपण भेटु दुपारी.” एवढं बोलून त्याने कॉल कट केला.
मी ओके म्हणे पर्यंत ही वाट पाहीली नाही. मी मात्र ‘काय सरप्राइज असेल?’ या विचाराने अस्वस्थ झालो. सौरभ मला ‘प्रपोज’ करतोय की काय? क्षणभर एक विचार डोक्यात आला. का ते माहित नाही पण अनेक विचारांची कालवा कालव होऊन मी खुप सैरभैर झालो. कधी एकदा दुपार होतेय असे मला वाटले.
दुपारचे साधारण बारा साडेबारा वाजले असतील. माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबर वरून कॉल आला.
मी घाईघाईने कॉल रिसीव्ह केला. पलीकडून एक स्त्री मंजुळ आवाजात बोलत होती. “May I speak with Mr. Swapnil?” पलीकडून विचारणा झाली.
मी स्वप्निल बोलतोय असे सांगितल्यावर तीनं सांगितले की ती बंगलोर मधील ‘हाॅटेल दि चान्सरी पॅव्हेलियन’ च्या रिसेप्शन मधुन बोलत आहे. “सर तुम्हाला भेटायला कोणीतरी आले आहे. आणि आजची तुमची अपॉईंटमेंट मागितली आहे. सर तुम्ही फ्री असाल तर आज दुपारी तीन वाजता ‘हॉटेल दि चान्सरी पॅव्हेलियन’ मध्ये भेटायला येऊ शकता काय?” तिने अदबीने विचारले.
मला क्षणभर काहीच कळेना हे काय चाललंय. पण मग लक्षात आलं की, अरे सौरभ आज मला सरप्राइज देणार होता. ते हेच तर नसेल? पण मग हॉटेल मध्ये काय काम असेल? जाऊ दे , बघु तिथे जाऊन हा काय करतोय?
असा विचार करत असतानाच त्या बाईने पुन्हा विचारलं की, सर तुम्ही आज तीन वाजता भेटायला येऊ शकता काय? “
“ओके मॅम” मी म्हणालो. मनात शंका होती म्हणुन मी विचारले की, “मॅम ती व्यक्ती कोण आहे? मला प्लिज त्यांचं नाव समजेल का?”
त्यावर “सॉरी सर, हे सरप्राइज आहे. आम्हाला नाव सांगायला अलाऊड नाही.” असे उत्तर मिळाले.
मग मी फार विचार न करता तीन वाजता येतोय असं सांगून फोन ठेवला.
डोक्यातील विचारचक्र मात्र अधिक वेगाने फिरु लागले. सौरभने मला हाॅटेलमध्ये का बोलावले असेल? काय सरप्राइज असेल? नक्की काय उद्देश आहे त्याचा? हे सगळं हाॅटेलमध्येच का? असे अनेक प्रश्न भेडसावत होते.
या प्रश्र्नांची उत्तरे तिथे गेल्याशिवाय मिळणार नव्हती. आणि हे सगळं पुन्हा भाईला समजले तर? अरे बापरे! मी जाऊ का नको? गेल्याशिवाय पुढचं काहीच कळणार नाही. पुढच्या परीणामांचा विचार नंतर करु असे मनोमन ठरवून मी भेटायला जाण्याचे निश्चित केले.
बरोबर ०३.२० वाजता मी ‘हॉटेल दि चान्सरी पॅव्हेलियन’ च्या रिसेप्शन काऊंटर वर उभा होतो. सौरभकडे जातो असे सांगून घरातून बाहेर पडलो, पण स्पेशल तयार होऊन, माझा अतिशय आवडता टि शर्ट घालून मी निघालो होतो.
ऑटो पकडून सरळ हाॅटेल गाठलं. काऊंटरवर माझी ओळख सांगितली. मग चौथ्या मजल्यावर रुम नंबर 402 मध्ये मला जाण्यास सांगितले. मी लिफ्टने चौथ्या मजल्यावर आलो. हॉटेलमधील प्रशस्तपणा, भव्यदिव्यपणा या सगळ्यामुळे मी पुरता भांबावून गेलो होतो. त्यामुळे मला कुठे जावे काहीच कळेना.
माझा गोंधळ उडालेला बघुन समोर उभा असलेला एक कर्मचारी पटकन पुढे आला, आणि “सर कुठे जायचे आहे?” असे अत्यंत अदबीने विचारले. तेव्हा मी “रुम नंबर ४०२” असं सांगताच, त्याने, “तुम्ही स्वप्निल सर का?” असे पटकन विचारले. मी बावचाळलो .
माझा गोंधळ उडालेला पाहून , तोच म्हणाला, “Sir, I am waiting for you.चला सर”
असे म्हणुन तो मला एका रुमच्या दरवाजापाशी घेऊन गेला, आणि दरवाजा पुढे ढकलून मला म्हणाला, “सर, ही आहे रुम नंबर ४०२. आतमध्ये सर तुमची वाट पाहत आहेत.”
दरवाजा लाॅक नव्हता तर फक्त पुढे ढकलला होता. कोण असेल आत? मला भिती वाटु लागली. मी भीत भीत विचारले, ” कोण आहे आत?”
वेटर म्हणाला, ” सर घाबरु नका, तुम्ही आत जा, तुम्हाला कळेलच की.”
मी दरवाजा नाॅक केला पण आतुन काही आवाज ऐकू आला नाही. मी तसाच आत शिरलो आणि चार पाच पावलं पुढे गेलो.
पाठीमागे दरवाजा आपोआप बंद झाला. आतमध्ये सगळा अंधार दिसत होता. मी जरावेळ जागेवर उभा राहिलो. इतक्यात स्टिरीओ सिस्टीमवर हळु आवाजात म्युझिक चालू झाले आणि हळूहळू खोलीत मंद लाईट लागले. आणि त्या अंधुकशा प्रकाशातही सगळी खोली आता दिसु लागली.
अरे बापरे! केवढा भव्य सुट होता तो. त्याची भव्यता नजरेत मावत नव्हती. पण जिथपर्यंत मला दिसत होतं त्यानुसार खोली रिकामी होती. आत कोणीच नव्हते. त्या अस्पष्ट उजेडात माझी नजर ‘त्याला’ शोधत होती. मी शोध घेत पुढे जाऊ लागलो. “कोण आहे आत?” मी आवाज दिला. पण काही रिस्पाॅन्स आला नाही. पण स्टिरीओ सिस्टीमवर गाणं चालू झाले. अभिजीत भट्टाचार्य गात होता…….
दुनियाॅ कें किसीभी कोनें में रहा,
तुमसें कितनाभी फासला रहा,
यकिंन मानों, मैने हर पल, हर मोड
तुम्हे साथ पाया.
समझ नहीं आता,
इस रिश्तें को क्या कहुॅ,
तुम कहों तो यार,
आज इसें एक नाम दुॅ!!
कभी यादोंमे आऊॅ,
कभी ख्वाबों हे आऊॅ,
तेरे पलकों के सायें
में आकर झिलमिलाॅऊ,
मैं वो खुशबू नहीं
जो हवा में खो जाऊॅ…
होओओओ, होओओओ s s s…
हवा भी चल रहीं है,
मगर तु ही नहीं है,
फिजा रंगिन वहीं है,
कहानी कह रहीं है,
मुझें जितना भुलाओ,
मैं उतना याद आऊ!
मैं वो खुशबू नहीं
जो हवा में खो जाऊॅ….
मी एक मिनिटभर तसाच विचार करत स्तब्ध उभा होतो. कोण आहे आत? काहीच कळेना. गाण्याच्या शेवटच्या दोन ओळींनी मी भानावर आलो, आणि शब्दांबरोबर मी त्या अनामिकाचा शोध घेत आत जात खेचला जाऊ लागलो असताना अचानक पहीलं गाणं बंद झालं आणि लगेच दुसरं चालू झालं.
जब से तुझे देखा, दिल को कोई आराम नहीं,
मेरे होटोंपर इक तेरे सिवाॅ,
कोई नाम नहीं,
अपना भी हाल तुम्हारे
जैसा है साजन,
बस याद तुझें करता हुॅ
और कोई काम नहीं
बन गया हुॅ मैं तेरा दिवाना
धिरे धिरे से दिल को चुराना!! होsss
धिरें धिरें से मेरी जिंदगी में आना,
धिरें दिलें से दिल को चुराना,
तुमसें प्यार हमें हैं कितना जानेजाना,
तुम से मिलकर तुमकों है बताना!!
आता माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती व मी त्या अंथुक प्रकाशात वेड्यासारखा सगळ्या सुटमध्ये त्याला शोधत होतो.
आणि आता न राहवून मी “सौरभ–सौरभ” “सौरभ पुढे ये, कुठे आहेस तु?” “सौरभ प्लिज बाहेर ये माझा अंत बघु नको” “मला समजलं राजा तुझं खुप प्रेम आहे ते, ही सगळी नाटकं करायची काय गरज आहे” असं काहीतरी बडबडत मी त्याला शोधत शोधत पलंगापर्यंत आलो. इतक्यात पुन्हा गाणं बंद होऊन आणखी एक गाणं चालू झाले.
तुम दिल की धडकन में रहतें हो रहतें हो,
मेरी इन साॅसों से कहते हो कहते हो,
बाहों में आ जाओ सपनों में खो जाओ…..
मला पाठीमागे काहीतरी अस्पष्ट हालचाल जाणवली. मी गर्रकन मागे वळून पाहिले तर डाव्या बाजूला गॅलरी दिसत होती पण गॅलरीचे पडदे लावले होते त्यामुळे बाहेरचं काही दिसत नव्हते. पण पडद्याच्या मागे हालचाल होत होती. मी एक्सायटेड होऊन गॅलरीकडे धाव घेतली पण घाबरुन मधेच थांबलो. गॅलरीचे पडदे हळूहळू बाजूला सरकत होते…
देर ना कर, दुनिया से ना डर,
सुन ले दुऑ, ओ बेखबर,
रुठ न मुझसे जानेजिगर,
कटता नहीं तेरे बिन ये सफ़र,
नजरे ढुॅढे तुझको, आ मिल जा तु मुझको,
माझं ह्रदय जोरजोरात धडधडु लागले, श्वास फुलला, छाती धपापु लागली कारण पडदे बाजूला होऊन गॅलरीतील आकॄती आता दिसु लागली होती. पण माणूस ओळखु येईना. मी त्या अंधारात डोळे मोठे करून त्याचं निरीक्षण करत होतो. तो हळूहळू पुढे सरकु लागला तसा मी मागे मागे सरकु लागलो. हा सौरभ तर वाटत नाही, मग कोण? मी मागे सरकत सरकत पलंगाला टेकलो आणि थबकुन तिथेच उभा राहीलो.
(अपूर्ण)
- या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
- अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
- प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे ही आवश्यक बाब समजावी .
No comments:
Post a Comment