तुमचा बिट्टू तुमच्या शुभेच्छांमुळे परत आला आहे. एक जीवघेणा अनुभव होता तो. कोव्हिड 19 च्या छायेत गेलो खरा. आपलं नशिबच असं गांडू की काही सरळसोटपणे होतच नाही.
पुलंच्या भाषेत सांगायचे झाले तर आम्ही तिकीट काढायला दोन तास उभे राहिलो की आमच्या नंबर आल्या बरोबर लंच टाइम होतो. लुख्खे लोक मल्टी विटामीन खाऊन बरे होतात आणि आम्ही जीम करत असून आय सी यू चे पप्पी घेऊन आलो. नुसती आय सी यू ची नाही यमाची सुद्धा.
एकट्या मित्राला मदत करताना मलाही हे चिकटले. लवकर लक्षात आले नाही. जेव्हा कळले तेव्हा परिस्थिति हाताबाहेर गेली होती. कशीबशी शेवटची कथा पूर्ण करून पोस्ट केली . अजूनही ऑफिसच्या कामाला सुरुवात केलेलीच नाहीये. बरेच दिवस आपली साईट पण चेक केली नव्हती. पण मित्रांचे मेसेजेस पाहिले आणि वाटले की चेहर्याने अनोळखी मित्रांचे एवढे प्रेम मिळवले हीच कमाई.
खूप सार्या मेल्स येऊन पडल्या आहेत . प्रत्येक मेलला उत्तर देणे शारीरिकदृष्ट्या शक्य होणार नाही. तेव्हा हीच तुमच्या मेलची पोचपावती समजा .
तर सांगायचा मुद्दा हा की हळू हळू लिहायला सुरुवात करेन. तेव्हा शुक्रवारची वाट पाहत रहा . असेच प्रेम करत रहा . तुमच्या कॉमेंट्स हीच माझी व्हायग्रा आहे.
तुमचा,
बिट्टू पुणेकर
No comments:
Post a Comment