सिद्धू , माझा वाचक. आपला ब्लॉग सुरू झाला तेव्हा अगदी पहिल्या कथेपासून माझ्याशी संपर्कात असणारा माझा छोटा मित्र.
सिद्धूच्या परीक्षा , करियर , मनातील वादळे त्याने वेळोवेळी माझ्याबरोबर शेअर केली. खरं तर वाचकापेक्षा तो माझा जवळचा मित्र झाला आहे. लहान आहे. अजून कॉलेज जीवनाचा आनंद घेतो आहे.
भावना उचंबळून आल्या की कुठे तरी व्यक्त व्हावेसे वाटते. सिद्धूचे वय असे आहे की कुणावर तरी प्रेम करावे असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. त्याने निवडले बिट्टूला. ज्याच्याशी केवळ आभासी दुनियेतून संपर्क साधू शकतो अश्या एका लेखकाला. सिद्धूच्या प्रेमाची ही उत्कट भावना आज तुमच्या बरोबर शेअर करत आहे. अर्थात त्याची परवानगी आहे म्हणूनच .
सिद्धूचा मेल आय डी मी देणार नाही कारण त्याची प्रायव्हसी जपायची आहे. आभासी दुनियेतील व्यक्तींवर फार विश्वास ठेवू नये हे सत्य आहे. अनेक वाईट विचार असणारे, दुष्ट हेतु मनात ठेवणारे लोक लांडग्याप्रमाणे या आभासी दुनियेत वावरत असतात. त्यामुळे आपल्याला कुणाचा विश्वास वाटला तरी विश्वास ठेवू नये असाच माझा सिद्धूला सल्ला आहे. जे दिसते तसं नसतं हाच या आभासी दुनियेचा एकमेव नियम आहे. सिद्धूने किंवा आपल्या इतर वाचकांनी सुद्धा हे पूर्ण लक्षात ठेवावे.
कवितेतील काव्य गुण न बघता त्याची उत्कट भावना लक्षात घ्यावी अशी सर्वांनाच विनंती आहे. सिद्धूने पण कविता लिहिताना कुठे कुठे चावट लिहिले आहे. आवडले मला ते.
===========================================================================================================
मागतो तुला तुझ्या कडून
तुझे प्रेम मला देशील का ?
एका प्रियकराची प्रेमाची विनंती ,
मी तुझा अन तू माझा होशील का ? ||1||
भेट देतो तुला मी माझ्या या जपलेल्या प्रेमाची
स्वीकार तू करशील का ? ||2 ||
मागतो तुला सात जन्मासाठी
तुझा हात माझ्या हाती देशील का ? ||3||
मागतो तुला तुझ्या कडून
तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||
वाट पाहतो तुझ्या उत्तराची
स्व हर्षाने होकार माझ्या प्रेमाला देशील का ? ||४||
राहीन सोबत पावला पावला वर
तुझ्या पायाची वहाण तरी मला करशील का ? ||५||
तुझ्या प्रेमाचा भुकेला मी
लाड माझे पुरवशील का ? ||६||
मागतो तुला तुझ्या कडून
तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||
सर्वस्व देईन रे तुला
पण माझा तू होशील का ? ||७||
जपेन तुला काळजाच्या तुकडया सारखा
माझे काळीज तू होशील का ? ||८||
होऊन मी नदी , येईन तुझ्या भेटीसाठी खोल खोल दर्यातून
माझ्या प्रेमाच्या अथांग सागरा सांग ना , भेट मला देशील का ? ||९||
मागतो तुला तुझ्या कडून
तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||
होऊन फुलपाखरू , येईन तुझ्या गोड प्रेमासाठी
मिठीत घेऊन तू , ‘ते’ मला पाजशील का ? ||१o||
तुझाच तुझाच ….तुझाच भुकेला
माझा होऊन, भूक माझी भागवशील का ? ||११||
या अंधारात एकटा मी, तू प्रेम ऊर्जा बिन्दु
तुझ्या प्रेम किरणांनी अंधार माझा दूर करशील का ? ||१२ ||
मागतो तुला तुझ्या कडून
तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||
या मुक्त आकाशात एकटा चंद्र मी
माझी लखलखती चांदणी होशील का ? ||१३||
मी बुडता तू प्रेम , आधाराची काठी
मज बुडत्याला तू तारशील का ? ||१४||
तुझ्या नामाचा वेडा मी
तुझे मनमोहि दर्शन मला घडवशील का ? ||१५ ||
मागतो तुला तुझ्या कडून
तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||
तुझ्या लेखनाचा दिवाणा मी , तू कलम आणि मी शाई
तुझ्या लेखनात मजला , कायमचे स्थान देशील का ? ||१६||
या एकांताच्या थंडीत फणफणलेला मी
तुझ्या प्रेमाच्या अग्नीत मला शेकवशील का ? ||१७ ||
मी तुझा सिद्धू आणि तू सिद्धूचा बिट्टू
अशी आपली जोडी शोभेल का ? ||१८ ||
मागतो तुला तुझ्या कडून
तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||
मी तुझा प्रेमी अन तू माझी प्रेमिका
असाच कायम राहशील का ?||१९||
ह्या खोटयांच्या गर्दीत हरवलेला मी
तुझ्या खर्या हातांनी मला सावरशील का ?||२०||
सात जन्माचे माहीत नाही मला
पण या जन्मी तरी तू , माझा होशील का ? ||२१ ||
मागतो तुला तुझ्या कडून
तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||
या शब्दांनी करतो हल्ला तुजवर
तू प्रेमाने मला शरण येशील का ? ||२२ ||
टाकतो मी जाळे तुझ्या प्रेमा साठी
तू स्वतःच येऊन त्यात अडकशील का ? ||२३||
पेरतो मी बियाणे आपल्या प्रेमाचे
खत पाणी त्यात टाकशील का ? ||२४||
मागतो तुला तुझ्या कडून
तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||
तुझ्या प्रेमाच्या आगमनाचा व्याकूळ मयूर मी
तुझ्या प्रेमवर्षावाने माझे मयूरपंख फुलवशील का ?|| २५||
माझ्या दुष्काळलेल्या आयुष्याला तुझ्या सहवासाने
तुझ्या पाण्याने हिरवेगार करशील का ? ||२६||
उघडा मी , घालून बिन बटणाचा शर्ट
माझ्या शर्टचे बटण होऊन अंग माझे ढकशील का ? ||२७||
मागतो तुला तुझ्या कडून
तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||
“उभारला” टावर आपुल्या प्रेमाचा , नको आधार कुणा तिसर्याचा
आपल्या प्रेमाच्या टॉवरचा, तू मुख्य खांब होशील का ? ||२८||
डी व्ही डी प्लेयर मी , रिकाम्या डीव्हीडी चा
तुझ्या प्रेमाची गाणी भरून मला “वाजवशील” का ? || २९||
जन्मी आलो आई च्या उदरी
मृत्यू तरी तुझ्या कुशीत देशील का ? || ३० ||
मागतो तुला तुझ्या कडून
तुझे प्रेम मला देशील का ? ||धृ ||
- या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
- अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
- प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे ही आवश्यक बाब समजावी .
No comments:
Post a Comment