आपले वाचक आणी लेखक प्रदीप यानी सांगितलेलया काही बहारदार आठवणी. प्रदीप यांना तुम्ही pgp030720@gmail.com या मेल आय डी वर संपर्क करु शकता.
दोघे भिंतीच्या आधारे उभे राहून आराम करीत होतो. पुन्हा एकमेकांसमोर गळ्यात गळा घालून तृप्ती अनुभवत होतो.
आता पुढे
या पूर्वीचे भाग येथे वाचा
वडाळ्याच्या भेटी नंतर देखील मी आणि उमेश भेटत राहिलो.
एकदा आमचे जुने घर होते, रिकामे, तिथे उमेशला घेऊन गेलो होतो. थोडी भीती वाटली कारण चाळीतले घर म्हणजे, घरातल्या माणसापेक्षा शेजारच्याला जास्त ऐकू जाते. तरी पण हिम्मत केली. दुपारची वेळ होती तरी आजूबाजूच्या बायका / काकू, ज्यांना मी दिवाळीचे पदार्थ करण्यात मदत करीत असे, त्या विचारू लागल्या. घरचे कसे आहेत? आजीची तब्बेत कशी असते, इ. हा तुझा मित्र का? अनेक प्रश्न.
आजूबाजूचे लोक जितके प्रश्न विचारू लागले तसा उमेश थोडा अनकंफर्टेबल झाला. मी त्याला थोडा धीर दिला आणि आत नेले. त्याच्या वडाळ्याच्या घरासारखेच हे घर होते. शिवाय रिकामे. उमेश उभ्याने छान सेक्स करतो हे आता एव्हाना मला माहीत झाले होते. त्यामुळे घरात पलंग, सोफा किंवा साधी खुर्ची देखील नाही हे माहीत असताना देखील मी त्याला तिकडे नेले होते. अहो! आम्हाला लोकलमध्ये उभ्याने संभोग करायची सवय !
मी दारावरचे कुलूप काढून दार उघडले. आम्ही आत गेलो तसे लगेच एकमेकांच्या तोंडात तोंड घालून डीप किसिंग करू लागलो. हळू हळू कपडे काढून खुंटीवर अडकवले आणि आमची अजून झटापटी सुरू झाली.
आम्ही जे काही करात होतो त्याला काय म्हणतात ते आज माहिती आहें.तेव्हा तर काही कळत नव्हते. कडलिंग म्हणजे मिठित घेणे , किंवा बॉडी प्ले म्हणजे शरीराशी खेळण्या इतके सुख कशातच नाही बघा. तरी पण लंड खुणावतोच ना. दोघांचे पण लंड एकमेकांना साद घालू लागले.
घरात 69 करायला पलंग वगेरे काही नव्हते. तरी पण आम्ही आलटून पालटून एकमेकांच्या बाबूरावांना थंड करीत होतो. कधी उमेश गुडघ्यावर बसायचा तर कधी मी. मी खाली बसलो की उमेश इतका मस्त माझ्या डोक्याचा मसाज करायचा की तिथेच झोपावे असे वाटायचे.
तो बसला की मी त्याचे हात वर घेऊन त्याची मऊ बोटे चोखायचो. काही वेळाने, आमचे दोघांचे बांध तुटायची वेळ येऊ लागली. दोघेही एकमेकांचे प्रि कम मस्त उस चघळल्या सारखा चोखत होतो. मग मी हळूच उमेशला म्हटले,
“आज माझी गांड नाही मारणार वाटते उमेश ?”
“सोन्या, आज कोंडोम विसरलो ना! सॉरी!! पण तू मला ठोकू शकतो”
“नको, सेफ वाटत नसेल तर कोणीच कोणाची नको मारायला”. असे मी म्हणत पुन्हा खाली बसलो.
थोड्या वेळाने आम्ही मग जरा पोझिशन बदलावी असा विचार केला. उमेश माझ्या मागे येऊन उभा राहीला. मला येऊन मागून त्याने कवटाळले. मला ही पोजिशन उभ्याने आणि झोपून, अगदी बसून सुद्धा आवडते. मी रघुनाथला असेच त्याच्या पाठीवर झोपून त्याच्या काखेतून आत हात घालून त्याला आवळून त्याला झवले होते.
लंड आत गेला नाही तरी खूप मजा येते.
उमेशने पण अशीच पाठीमागून मिठी मारून माझ्या सर्व पार्श्व भागाचा ताबा घेत मला कवटाळले. कान, मान, पाठ,.. आणि अगदी पायाच्या पोटऱ्या देखील. साहजिकच, गांडीवर येऊन तो स्थिरवणार नाही तरच नवल.
मी पण मागे वळून वळून त्याला जमेल तसे किस करीत होतो. आणि त्याला हाताने आणखी जवळ खेचत होतो. तो मध्येच माझी छाती हातात घेऊन बोंडावर बोटे फिरवत होता. बोच्यावर त्याची जीभ आणि हात दोन्ही शिताफीने फिरू लागले. मध्येच खाली वाकून माझ्या भोकात मस्त बोट आणि जीभ आलटून पालटून सरकवत होता. मलाही ते आता आवडू लागले होते. शिवाय मध्ये मध्ये तो हात हळूच सरकवत माझ्या ताठ झालेल्या लवड्या पर्यन्त नेत होता.
“इथेच गाळू की काय उमेश?”
“नको, नको” करीत उमेश ओरडला. अजून एक प्रकार करायचा आहे. असे म्हणत परत त्याने माझे झाटे आणि जांघा यातली बोटे काढून गांडीवर फिरवली. जांघे मधली फिरलेली बोटे पण एक वेगळीच गोड कळ देऊन गेली होती. आजही तो एक माझा “जी” स्पॉट किंवा वीक पॉइंट आहे.
काही वेळाने, मी उमेशला पाठमोरे करून त्याचे स्तनाग्रे कुरवाळू लागलो. त्याची छाती म्हणजे माझा वीक पॉइंट. मी पण नंतर गुडघ्यावर बसून त्याचा बोचा चाटू लागलो. त्याचा पण लवडा मी मागून हात घालून घुसळू लागलो. मी खाली वर करताना, त्याच्या गांडीच्या फटीत माझा लंड रुतत होता.
काही वेळात इकडे मी झडायच्या आधी उमेशने मला हाताला धरून पुढे आणले आणि म्हणाला,
“नवीन प्रकार करायचा का?”.
मी लगेच हो म्हणालो. तसा त्याने माझा लवडा हातात घेतला, आणि त्याचे पुढचे कातडे मागे सरकवले. मग स्वतःच्या लवड्याचे कातडे दोन्ही हातांनी फाकवून माझ्या ताठलेल्या लवड्यावर चढवू लागला.
मी पण हाताने माझा लंड धरून ठेवला. मग त्याने माझे मागे सारलेले कातडे स्वतःच्या लंडावर घेतले. अलीकडे त्याला डॉकिंग म्हणतात असे ऐकले.
दोघांचेही लंड झडायच्या बेतात होते. त्यामुळे, थोडेफार मागेपुढे केल्या बरोबर मस्त चिक बाहेर येऊन दोघांचे लंड माखले गेले. आधी कोणी गाळले हे कळायच्या आतच आम्ही एकमेकांना मिठया मारून सावरू लागलो. उमेश दरवेळी स्वर्गाची नवी नवी दारे माझ्या पुढे खोलत असतो. त्यामुळे मला त्याची संगत खूप आवडायची.
अजून एक किस्सा चेंबुर मधला आठवतो. एके दिवशी उमेश दुसऱ्या एका मित्राच्या फ्लॅटवर मला घेऊन गेला. तिकडे फ्लॅट जरी असला तरी चाळीत आल्यासारखे वाटत होते. खूप गजबज.
आम्ही दोघे त्या फ्लॅटमध्ये शिरलो आणि दार लाऊन घेतले. पलंग बघून मी खुश झालो. दोघांसाठी कोंडोम उमेशने घेऊन ठेवले होतेच. hugging , kissing , cuddling , एक एक करत आमचा काम आवेग वाढवत होता. मध्येच दारावर ठकठक ऐकू आली.
मी आत मध्ये गेलो आणि उमेश हाफ़ पॅन्ट घालून उघडाच दार उघडायला गेला. मी मनात म्हणालो, त्या डोंबिवलीवाल्या मित्राकडे झाले किंवा रवीच्या घरी झाले तसे नको परत. त्यात हा शर्ट न घालता गेला. दार उघडून उमेशने पाहिले तर कोण नव्हते. पण पुढे निघून गेलेल्या माणसाने मागे वळून पाहिले आणि सॉरी म्हणाला, चुकून दार ठोठावले.
उमेश आत येत येत पुटपुटला, “भेंचोद आमच्या उठलेल्या लंडावर पाणी ओतले, तुझा पण सेक्स असा कोणीतरी झवाडा डिस्टर्ब करू दे.”
मी बाहेर येत येत हसलो. म्हटले जाऊ दे रे, कशाला आई बहीण काढतो?
“लवड्या तुला काय? आज माझा मस्त मूड झाला होता. येडझव्याने गांड मारली फुकटची,” उमेश वैतगलेला होता.
“अरे हो! ये परत बेडवर. मस्त ताठवतो परत माझ्या पोपटाला” मी म्हणालो.
एकमेकांना कुशीत घेऊन कुरवाळत आम्ही पलंगावर आडवे झालो. मस्तपणे मी उमेशला नागड्याने मिठी मारून चाळवायचा प्रयत्न करीत होतो. पण खरंच त्याचा मूड ऑफ झाला होता. शेवटी मी उठून त्याच्या लवड्याला तोंडात घेऊन ताठवू लागलो. हा पण बाबू झोपायच्या मूड मध्ये होता.
“उमेश, नसेल करायचे तर जाऊया!” असे म्हणत मी उठून बसलो.
“का? झवझवी पुरतीच आपली मैत्री का?” उमेश ने उलट प्रश्न केला.
मी अवाक झालो. “नाही रे राजा माझ्या. तुझा मूड नाही ना म्हणून म्हणालो.” मी उमेशची समजूत काढली.
“मग झोप माझ्या कुशीत. कधी कधी असेच एकमेकांच्या कुशीत नागडे झोपावेसे वाटते,” उमेश म्हणाला.
आम्ही तसेच बराच वेळ नागडे एकमेकांच्या कुशीत झोपलो. बाहेरचा आवाज मध्ये मध्ये डिस्टर्ब करत होताच. पण आमचा छान वेळ गेला. आज कोणी कुणाचे पाणी काढले नाही. संध्याकाळ झाली तसे आम्ही उठलो आणि कपडे घालून बाहेर पडलो.
उमेशने बाहेर एका टपरीवर लगेच एक सिगारेट सुलगावली आणि मस्त झुरके मारत माझ्या सोबत चालत होता. लॉजमध्ये झालेली माझी उलटी आठवून, उमेशने मला ओढू दिले नाही. आम्ही पुढे गीता रेस्टौरेण्टमध्ये डोसे खाल्ले आणि मस्त फिल्टर कॉफी प्यायलो. चेंबुर स्टेशनला येऊन आम्ही एकमेकांना एक मस्त मिठी मारली आणि ट्रेन आली तसे आपापल्या घरी निघून गेलो.
लोकलचे किस्से सांगावे तेवढे थोडेच. अनेक जण भेटले. एकदोन किस्से सांगून शेवटचा एक अफलातून किस्सा सांगून संपवतो.
Flirting and Finding Marathi Gay fuck buddy in Mumbai Local trains
एकदा अंधेरीला एकजण लोकल मध्ये चढला. उंच मद्रासी तरुण होता. उंच लोक लगेच माझ्या नजरेत भरतात त्यामुळे त्याच्यावर लगेच नजर खिळली माझी. मी त्या दिवशी दारात उभा नव्हतो. ऑफिससाठी ये-जा करणाऱ्या, गर्दीत सुद्धा शिस्त पाळणाऱ्या चाकरमान्यांचा दिवस नव्हता तो. सुट्टी होती.
वडिलांनी खार मध्ये राहणाऱ्या त्यांच्या मित्राकडे काही कामानिमित्त मला पाठवले होते. दारात उभे राहायला जागा नाही मिळाली म्हणून मध्ये कुठेतरी उभा होतो. त्या मद्रासी माणसाची पण माझ्याकडे नजर वळली आणि त्याने वाट काढत माझ्या जवळ उभा राहण्याचा प्रयत्न केला. मी पण त्याला वाट काढून देत होतो. शेवटी आला तो माझ्या समोर.
ह्या पठयाने डायरेक्ट्लि माझ्या शर्टाची बटणे काढून डायरेक्ट माझी बोंडे कुरवाळायला सुरुवात केली. मला एवढ्या अनुभवानंतर देखील हे असले धाडस करायला संकोच वाटू लागला. त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो चांगलाच पेटला होता. त्याच्या उंच देहा पुढे माझी छाती झाकली जात होती म्हणून बरे.
मला पण बरेच दिवस कोणी भेटले नव्हते म्हणून मी पण उपाशी होतो. उगाच चालून आलेली शिकार का गमवायची ? मी पण मग त्याला प्रतिसाद देऊ लागलो. गर्दी तुडुंब होती आणि त्यामुळे आम्ही थोडी फिकीर बाजूला ठेऊन दिली. त्याने त्याचा लांबसडक लवडा तिथल्या तिथे झिप मधल्या फटीतून काढून माझ्या हातात दिला आणि माझ्या पॅन्ट मध्ये हात घालून माझा लवडा मदन मस्त होऊन मागे पुढे हलवू लागला. मी पण त्याचा हलवत होतो.
गर्दी आणि मुंबईची गरमी यात आम्ही दोघेही घामाघूम झालो. पण आम्हाला एवढा वेळ मिळाला की आम्ही दोघेही तिथेच आपापल्या पॅन्ट मध्ये झडलो. मला खूप आवडला होता तो. Tall Dark Handsome.. त्याने अगदी घरचा पत्ता देऊन मला बोलावले देखील. पण नाही सवड मिळाली जाण्याची. जायला पाहिजे होते हे अजूनही वाटते. ..
अजून एक गमतीदार असा प्रसंग. रोज पाहायला मिळायचा! एक थोडा वयस्कर माणूस गाडीत शेंगदाणे विकायचा . १ -२ रुपयाला त्यावेळी पाकिटे मिळायची शेंगदाण्याची. पण त्याला एक चावट सवय होती. तो प्रत्येकाच्या बुल्ल्याला हात लावायचा आणि सिग्नल द्यायचा. द्वी अर्थाने त्याला गाडीत “दानेवाला आया रे” अशी खिल्ली उडवून अनेक जण तो आल्याचा जणू इशारा द्यायचे.
एकदा “हा” दानेवाला , मी उतरणारे स्टेशन जवळ येत असताना माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला आणि मागे हात घालत माझ्या लवड्यावर दाब टाकीत होता. मला कळेना, प्रतिसाद द्यावा की नको. विरोध न करणे ही एक प्रकारची मुक संमती असायची. पण मला उतरण्याची घाई होती त्यामुळे मी काही प्रतिसाद दिला नव्हता. स्टेशन येताच मी उतरलो.
हा तर आधीच उतरला होता. आणि माझ्या सोबत चालू लागला. माझ्या कपड्यावरून आणि हातातल्या बॅगेवरून याने हेरले की मी कुठल्यातरी चांगल्या कंपनीत नोकरी करीत असणार.
“सो यंग मॅन! लेट्स हॅव अ कप ऑफ कॉफी टुगेदर”
मला त्याचे इंग्रजी अनपेक्षित होते. पण एका चांगल्या माणसाशी ओळख होते म्हणून मी आढेवेढे न घेता तयार झालो. आमच्या घराजवळच तो राहत होता. म्हणून त्यांच्या घरी जायला मी बिचकलो नाही.
खूप सोज्वळ माणूस निघाला. नाव चंद्रशेखर सांगितले त्यांनी. पुढे मी त्यांना शेखर kaka म्हणू लागलो. बहुतेक सत्तरी ओलांडली असावी. घरी एकटाच असावा असे वाटले. एका नावाजलेल्या संघटनेचा कार्यकर्ता निघाला तो.
आम्ही कॉफी घेतली सोबत. खूपच गोड बोलून कॉफी अजून मधाळ केली त्यांनी.
“तुम्ही शेंगदाणे का विकता ट्रेन मध्ये?” मी लगेच मनातले विचारले. “म्हणजे एवढे सुशिक्षित असताना आणि घरची परिस्थिति पण चांगली वाटते”!
“अरे माझा एकटेपणा घालवण्याचा तो एक मार्ग आहे. मला कोण काय म्हणते, नावे ठेवते याचा मी जास्त विचार नाही करत. शिवाय तुझ्या सारखी अशी गोड माणसे भेटणे हा मोठा फायदाच! नाही का?” तो म्हणाला.
त्यांचा मान ठेऊन मी त्यांना अहो-जाहो करायचो, पण कथेत एकेरीवर आलो. शेवटी मुंबईचे संस्कार. एकदम कुणाला एकेरीवर नाही आणायचो आम्ही !
त्याने बोलता बोलता मला त्याच्या पलंगावर बसवले. पाठीवर हात फिरवत गप्पा चालू होत्या. त्याचे दिल्लीला घर होते मुलाचे पण तो मराठी, कोकणस्थ. दिसायला गोरापान, घारे डोळे, पोट सुटलेले, अंगावर सुरकुत्या, अनेक भागात लोंबकळणारी पण अगदी तुकतुकीत त्वचा. गोड हास्य.
बोलता बोलता त्याने हळूच माझे चुंबन घेतले. शर्टाची बटणे काढली आणि वरच्यावर माझ्या बनियन मधून हात घालून माझ्या छातीवर, पोटावर, आणि निप्पलवर मस्त हात फिरवू लागला. त्याने मग माझा शर्ट काढून जवळच हँगरला अडकवून ठेवला. शेवटी कोकणस्थ शिस्त सेक्स करताना पण दिसून येते.
मी प्रतिसाद देत बनियन काढून ठेवले. त्याने हाताऐवजी पुढचे काम तोंडाने केले. आम्ही एकमेकांचे चुंबन घेऊ लागलो. त्यांची वयामुळे मऊ पडलेले ओठ खूप भारी वाटत होते. अगदी चॉकलेट चघळावे तसे वाटत होते. त्यांनी माझे बोबे पण मस्त चोखून काढले. खाली येत येत त्यांनी जमिनीवर फदका मारला आणि आता पॅन्टचे हुक आणि झिप काढत माझ्या अन्डरवेअरमध्ये हात घातला.
“मी आवडलो नाही का” त्यांनी एकदम प्रश्न केला.
“नाही हो, तसे नाही. का वाटले तुम्हाला असे?”
“मग तुला नाही तर तुझ्या बाबूरावला आवडलो नसेन” आता माझ्या लक्षात आले ते असे का म्हणताहेत.
“अहो त्याचे भारी चोचले असतात” असे मी त्यांना indirectly बोललो.
“हरकत नाही, मी आहे ना त्याचे चोचले पुरवायला ” असे म्हणत त्यांनी लगेच माझा अर्धवट ताठलेला लंड तोंडात घेतला.
“आता तुला मी पुढची स्टेप शिकवतो.” असे म्हणत शेखर काकांनी सर्व कपडे काढले आणि फरशीवर टाकलेल्या दुसऱ्या गादीवर पालथे झोपले, पोटावर. त्यांच्या वयाच्या लोकांना वाटायचे आजकालच्या मुलांना सेक्स म्हणजे काय हेच माहीत नाही. म्हणाले, “आता असा माझ्या पाठीवर ओणवा हो आणि ताठलेला तुझा लंड आत घाल माझ्या गांडीत.”
“काका कोंडोम नाही माझ्याकडे. चालेल का रॉ ठोकले तर” माझे हे शब्द ऐकून काका चांगलेच हबकले आणि जोरात हसू लागले.
“लबाड, बरीच टोकाठोकी केलीय वाटते! बर, मला चालेल, पण या वयात त्वचा कोरडी असते. तर थोडे क्रीम लाव “
मी लगेच माझा ताठलेला लंड त्यांच्या मऊशार गांडीत घालू लागलो. गांडीत चिकटपणा वाटत होता. कदाचित रोज मॉईश्च्रायज़र लावत असतील. मला या पोजिशनमध्ये झवायला खूप आवडते. त्यांच्या मऊ पाठीवर मस्त वाटत होते. त्यांना झेपेल तसे माझे ठोके कमी जास्त करत मी एकदाचा त्यांच्या गांडीत रिकामा झालो. खूप छान वाटले. वयस्कर माणसाला ठोकण्याचा तो माझ्या आयुष्यातला पाहिला आणि शेवटचा प्रसंग होता.
मी लगेच माझ्या झिंगा झालेल्या पोपटला घेऊन त्यांच्या शेजारी पडलो. काकांनी पाठीवर झोपत मला कुरवाळले, माझी पापी घेतली, आणि चिकट झालेला माझा लंड तोंडात घेऊन पुसून दिला. त्यांनी पण उठून लगेच चूळ भरली आणि किचनमध्ये जाऊन गॅस पेटवला.
मी उठून कपडे घालू लागलो तसे त्यांनी मला थांबवले आणि म्हणाले तुला डोळे भरून नागडा पाहायचा आहे. थांब जरा. असे म्हणत पुन्हा ते किचनमध्ये गेले आणि माझ्या साठी गरमागरम चॉकलेट ड्रिंक घेऊन आले.
“माझा बाळ थकला असेल. हे पी आणि फ्रेश हो” मी खुर्चीत नागडाच बसलो होतो आणि काका माझ्याकडे कौतुकाने पाहत होते. जणू काही मी कुठली कुस्ती जिंकून आलोय.
“काका मला उशीर होतोय. जाऊ का घरी आता?”
“बर निघ बेटा” एक शेवटची नागव्याने मिठी मारीत काका बोलले. पुढे मला सोडायला अगदी घरापर्यन्त आले.
त्यांना माझा खूप लळा लागला त्या दिवसापासून.
दुसऱ्या दिवशी ऑफिस मधून घरी पोहोचलो तर शूज काढत असताना, आईने एक मिठाईचा पुडा माझ्या हातात ठेवला.
“तुझे शेखर काका देऊन गेले. कोण आहेत रे हे? जवळ राहतो म्हणाले पण आपली कधी ओळख नव्हती म्हणून विचारते. खूप छान स्वभाव आहे त्यांचा. आणि तू त्यांना खूप आवडतो म्हणाले. तसा आमचा लाल्या सर्वांना आवडतो म्हणा, ” असे म्हणत आईने माझ्या तोंडावरून हात फिरवला. ओळख कशी हे मी मनात जुळवत असतानाच ती आत निघून गेली.
काका नंतर भेटले नाहीत. बहुतेक आमच्या वेळा जुळायच्या नाहीत.
एके दिवशी पुन्हा घरी आल्यानंतर आईने हातात एक चिठ्ठी ठेवली आणि म्हणाली,
“काका त्यांचा दिल्लीचा पत्ता देऊन गेलेत. म्हणाले प्रदीपला पत्र लिहायला सांगा जमेल तसे”.
मला खूप वाईट वाटले. न भेटता कसे काय निघून गेले? पण तरी त्यांना पत्र लिहायला मला कधी सुचले नाही. कदाचित कंटाळा केला मी. पण त्यांचेच एके दिवशी खुशालीचे पत्र आले.
पूर्वी ३ रुपयाचे अंतर देशी पाकीटा सारखे पत्र असायचे. त्यावेळी खूप जण १ रूपयाच्या पोस्ट कार्डावर पत्र लिहून पाठवत असत. त्यामुळे अंतरदेशीय पत्र आले की जरा वेगळ्या नजरेने पहायचे. पण काकांचे पत्र म्हणून घरच्यांनी ते उघडून न पाहता मला दिले.
खूप हळवे होऊन काकांनी ते पत्र लिहिले होते. माझ्या पत्राची खूप वाट पाहून अंदाजाने पत्ता टाकून त्यांनी मला पत्र लिहिले होते. “कोरे पत्र तरी पाठव मला”. मी शेवटची ओळ मला खूप रडवून गेली. पण तरी त्यांना पत्र लिहायचे राहूनच गेले.
एकदा आईने आठवण करून दिली. काय लिहावे सुचेना. म्हणून त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी अक्षरशः कोरे अंतरदेशीय पत्र पाठवले. त्यांचे लगेच काही दिवसांनी उलट पत्र आले. पूर्वी खुशालीचे पत्र महिना -सहा महिन्यांनी येत असे.
काकांचे पत्र लगेच १५ दिवसात आले. ह्यावेळी आईने ते पत्र फोडून वाचले आणि मी घरी गेल्या गेल्या माझ्या हातात ठेवत मला ओरडली.
“अरे एखादा आपल्याला जीव लावतो तर आपण त्याची थोडी तरी कदर करावी”.. मी हादरलो. म्हटले काय असे झाले? पत्र वाचून पाहिले तर त्यांनी माझ्या कोऱ्या पत्राचा उल्लेख करीत मला हसत हसत प्रेमाच्या काही गोष्टी शिकवल्या. त्यानंतर मी त्यांना नियमित पणे पत्र लिहायचो. पण त्याचे २-३ दाच उत्तर आले त्यांचे. त्यापुढे जवळ जवळ माझी ६-७ पत्रे गेली. उत्तर नाही आले.
“उम्र भर चाहे कोई पुकारा करे ऊनका नाम, वो फिर नहीं आते..”
(क्रमशः)
चालत्या बसमध्ये चोखायला दिला
बिट्टुला त्याचे प्रेम सापडल्याची ही कथा
या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे ही आवश्यक बाब समजावी .
No comments:
Post a Comment