Copy Not Allowed

Friday, 29 June 2018

लिंगभेद भ्रम अमंगळ लोकसत्ता पाक्षिक सदर

अशोक  रावकवी , समलिंगी तसेच आपल्यासारख्या इतर लोकांच्या हक्कांसाठी झगडणारे एक बुजुर्ग व्यक्तिमत्व म्हणून बऱ्याच लोकांना माहित आहेत. स्वतः एक पत्रकार असणारे अशोकजी आज ७१ वर्षांचे आहे . त्यांच्या तारुण्यात सुरु झालेला हा अस्तित्वाचा लढा आजही सुरूच आहे .

त्यांच्या खळबळजनक आयुष्याची कहाणी आणि LGBTQ समुदायासंदर्भातील त्यांचे चिंतन लोकसत्ता सारखे प्रतिष्ठित दैनिक दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध करत आहे.
तुम्हाला या लिखाणाची माहिती व्हावी आणि  LGBTQ समुदायाबद्दल काही अभ्यासपूर्ण माहिती समजावी म्हणून या लेखांच्या लिंक मी शेअर करतो आहे .
मन मारून राहणे  म्हणजे आयुष्य जगणे नव्हे तर मुक्तपणे जगणे, कुठलीही अपराधी भावना मनात न आणता जीवनाचा आनंद घेणे हाच  जीवनाचा उद्देश आहे . अशोकजींचे  लिखाण वाचून त्यांनाही असेच वाटत असावे असे माझे मत झाले. तर या आठवड्यात नेहेमीच्या गोष्टीला सुट्टी. या आठवड्यात खाली दिलेले लेख वाचा….मुंबईचा एक नवा  पैलू समजून घ्या .
कॉपीराईटचा भंग नको म्हणून मी त्यांचे लेख इथे छापले नाहीत . लेखनाचा मूळ स्रोत म्हणजे लोकसत्ता . त्या लिंक्स खाली दिल्या आहेत जरूर वाचा …पेज लिंक खालील प्रमाणे 

No comments:

Post a Comment

Followers