Copy Not Allowed

Friday 24 January 2020

डोळे हे जुलमी गडे भाग 1 Marathi Gay Life

#marathigay त्याने पटकन माझा हात पकडला व मला पुढे ओढले आणि डोळे मिचकावत हळूच म्हणाला, "इस बार तो नहीं लगा, सच्ची?" मला काहीच समजेना, मी एक जळजळीत कटाक्ष टाकला व पटकन हात सोडवून वर गेलो.



जीवनातले असे काही अनुभव असतात की कुणाला तरी सांगितल्याशिवाय चैन पडत नाही.
पण कुणाला सांगणार ? या दुहेरी जीवनात तुमचे अनुभव ऐकायचे कुणाला ? आणि विश्वास तरी कोण ठेवणार ?

आजचा आपला लेखक स्वप्नील सातारकर अश्याच कष्मकश मधून लिहिता झाला. त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा हा अनुभव त्याने अतिशय सुंदर शब्दात मांडला आहे. माझी भूमिका फक्त भारवाही हमालाची आहे.  

स्वप्नीलला तुमचा अभिप्राय कळवायचा असल्यास satarkar.swapnil79@gmail.com  या मेल आयडीवर लिहा.

तुमची अशी काही कहाणी असेल तर मला सांगा chikanamulaga at gmail.com वर मेल करा . 
=================================================================



ही घटना ६ वर्षांपूर्वी मी साधारण १८ वर्षांचा असताना एका प्रवासादरम्यान घडलेली आहे. मी १२ वी ची परीक्षा नुकतीच दिली होती. परीक्षा संपल्यामुळे मी तसा एकदम फ्री होतो. मित्रांबरोबर मौजमजा, मस्ती चालू असायची. परीक्षा संपल्यानंतर २०--२२ दिवसांनी आम्ही दिल्लीला एका लग्न-समारंभासाठी जाणार होतो. 

बाबांच्या बॅंकेतील एक स्टाफ मेंबर नाॅर्थचा होता. त्याचे लग्न दिल्लीला होते. आम्ही घरातले सगळेच लग्नाला जाणार होतो. आणखी बाबांच्या बॅंकेतील १--२ मित्रांच्या फॅमिली पण बरोबर असल्याने तेथुन पुढे १० दिवसांची ट्रिप नैनिताल, मसुरी, अल्मोडा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, हरिद्वार, आग्रा अशी आयोजित केली होती. त्याची तयारी घरात आधीपासूनच सुरू होती. बाबांनी सगळी बुकिंग व विमानाची तिकिटे सुद्धा बुक करणार होते. 



त्याच वेळी माझा मित्र सौरभ मला म्हणाला की तो त्याच्या मावशीकडे रायचुरला जाणार आहे, तेव्हा आपण रेल्वेने जाऊयात. मी सुरुवातीला नकार दिला, पण सौरभ त्याचा हट्ट सोडेना. त्यानं प्रस्ताव मांडला की आपण रायचुरमार्गे दिल्लीला जाणारी रेल्वेने जाऊ. तो रायचुरला उतरेल आणि मी त्याच गाडीने पुढे दिल्लीला जावे. मला विचार पटत होता. घरातुन परवानगी मिळवणे अवघड होते. 



मी धाडस करुन बाबांना याबद्दल विचारले. तेव्हा बाबा खुप रागावले. आईने तर स्पष्ट नकार दिला. मी भाईची मध्यस्ती घालून कसेबसे बाबांना तयार केले.भाईने बाबांना व आईला छान पटवून दिले की, माझ्या मध्ये डेअरींग यायला हवं यासाठी मला एकट्याला रेल्वेने जाऊ द्यावे. मग दोघं ही तयार झाले. 



"भाई", माझा मोठा भाऊ. माझ्या पेक्षा वयाने ६ वर्ष मोठा आहे. भावापेक्षा जास्त तो माझा जवळचा मित्र आहे. आम्ही प्रत्येक बारीक गोष्टसुद्धा एकमेकांशी शेअर करायचो. तो नियमित जिम करायचा. 



मी घरात सर्वात लहान असल्यामुळे लाडात वाढलो, त्यामुळे प्रचंड हट्टी व हेकेखोर, तितकाच खोडकर देखील. याउलट भाई अतिशय समजुतदार. मला भाईंच्या सहवासात प्रचंड सुरक्षित वाटायचं. मी खूप लहान असल्यापासून मला एक सवय होती ती म्हणजे, कायम भाईला घट्ट मिठी मारुन झोपायचो, अगदी आतापर्यंत. 

तो वैतागुन म्हणायचा कधी कधी, "खंडु, (खंडु हे माझं घरातले टोपण नाव) तु आता मोठा झालाय रे, सवयी बदल आता. माझं लग्न झाल्यावर कसं करशील." 

मी पण त्याला गमतीने म्हणायचो, की, "मी तुला लग्नच करू देणार नाही." भाई बरोबर असला की मला कधीही कुठलीही चिंता नसायची की कुठली अडचण यायची नाही. आणि कुठे अडचण आली तर मी सगळ्यात आधी भाईची मदत घेत असे. 

अरे हो पण मी कोण? सांगायचे राहिलेच की? 

मी स्वप्निल, "स्वप्निल पाटील." मुळचा सातारचा म्हणुन मित्र मला सातारकर म्हणुन हाक मारायचे. दिसायला एकदम हीरो नाही, पण बऱ्यापैकी देखणा म्हणता येईल असा होतो. टपोरे पाणिदार तेजस्वी डोळे हे माझं मुख्य वैशिष्ट्य किंवा अस्त्र म्हणा, धारदार नाक, रसरशीत ओठ, आणि गोरापान रंग, उंची ५ फुट ९ इंच. लाडात वाढलो त्यामुळे अंग चांगले भरलं होतं. 

आणि हा मी ...स्वप्नील .....काल्पनिक चित्र

भाई मला नेहमी म्हणायचा, "खंडु, मला तुझी खुप काळजी वाटते. कसं व्हायचं तुझं? तु खुप निरागस आणि अल्लड आहेस अजून." हल्ली (भाईंच्या भितीने) मी थोडीफार जिम देखील करत होतो. 

मी समलिंगी नव्हतो. मला मुलांचं आकर्षण वाटलं नाही. तसंच मला मुलींचही फारसं आकर्षण वाटलं नाही. नाही म्हणायला माझ्या १--२ मित्रांनी काही वेळा माझ्या बरोबर फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण् मी त्यांना दाद दिली नाही. त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे पुन्हा त्यांनी तसा प्रयत्न केला नाही. असो.... 

तर शेवटी बाबांनी माझं आणि माझा मित्र सौरभचे, रेल्वे तिकीट बुकिंग केले गेले. गाडी नं. २२६९१ -- KSR बेंगलोर ते हजरत निजामुद्दीन दिल्ली, राजधानी एक्सप्रेस या गाडीचं २ बर्थ असलेल्या F केबिनचे तिकीट मिळाले होते. 

३० एप्रिलला लग्न होते. मी २७ एप्रिल ला रात्री निघुन २९ तारखेला सकाळी ६.०० वाजता दिल्लीला पोहोचणार होतो.सौरभ मध्येच रायचुरला उतरणार होता तेथुन पुढे जवळजवळ २७ तासांचा प्रवास मला एकट्याला करायचा होता. 

घरचे सगळे २९ तारखेला सकाळी ९.०० वाजता निघुन दुपारपर्यंत दिल्लीत पोहोचणार होते. ३० तारखेचे लग्न उरकून आम्ही लगेच पुढे ट्रिपला जाणार होतो. असा सगळा प्रोग्रॅम ठरला होता. 

अखेर २७ एप्रिल हा दिवस उजाडला. माझी पुर्ण तयारी झाली होती. म्हणजे बऱ्यापैकी तयारी भाईनेच करून दिली होती. बाबा आणि भाई मला सोडायला स्टेशनवर आले होते. सौरभ, त्याच्या बाबांबरोबर आला होता 

भाईने H1 बोगी शोधून आम्हाला आमच्या केबिन मध्ये बसवले. त्याच्या सतत सुचना चालू होत्या पण मी वेगळ्याच विश्वात होतो तेव्हा माझे कशाकडेच लक्ष नव्हते. त्याच्या डोळ्यातुन माझ्या विषयीची चिंता, काळजी, प्रेम ओसंडून वाहत होते. अखेर हाॅर्न वाजला आणि गाडी प्लॅटफॉर्मवरून गती घेत घेत पुढे सरकू लागली. गाडीच्या वाढत्या गतीबरोबर बेंगलोर मागे पडू लागले, आणि सुरू झाला माझा "प्रवास" एका नव्या, अनोळखी, अद्भुतरम्य, स्वप्नांच्या पलीकडल्या जगाकडे. 

आता बेंगलोर मागे पडलं होतं. आता आमची फुल टू धमाल चालू झाली होती. दोन बर्थचे केबिन असल्यामुळे आम्ही दोघेच होतो त्यामुळे आमची पाहिजे तशी दंगामस्ती सुरू होती. तसंही बेंगलोर पासून रायचुरचे अंतर फक्त ७ तासांचे आहे तेथुन पुढे मी एकटाच जाणार असल्यामुळे आम्ही झोपायचे नाही तर फक्त दंगा करायचा असे ठरवले होते. 

सौरभने पॅन्ट काढून बर्म्युडा घातला तर मी थ्रि फोर्थ आणि टि शर्टवर होतो. सौरभला मी प्रथमच पॅन्ट शिवाय बघत होतो, अतिशय हॉट दिसत होता तो. रात्री ९.३० ला केटरींगचा कर्मचारी जेवणाची ऑर्डर घेऊन गेला. आणि अर्ध्या तासानंतर जेवण घेऊन आला. 

आता आमच्या गप्पा सुरू झाल्या. सौरभ कन्नड गाणी छान म्हणायचा, म्हणुन मी त्याला गाणी गायला लावली. अर्धा पाऊण तासात धर्मावरम आलं. आता आमच्या गप्पा हळूहळू सेक्स या विषयाकडे वळल्या. मी प्रथमच या विषयावर कोणाशी तरी मोकळेपणाने बोलत होतो. सौरभने त्याच्या कॉलनीतील एका मुलीला प्रपोज करणार असल्याचे सांगितलं. 

त्यानं मलाही विचारले तेव्हा मी गमतीने त्याला म्हणालो की, "मला तर तु आवडतोस". यावर खुप आश्र्चर्याने त्यानं विचारलं की, "तु गे आहेस का?" खरं तर हे माझं मलाच कळत नव्हते की मी असं कसं काय बोललो. 

मी त्याला म्हणालो, “असे काहीच नाही, आणि मी खुप गमतीने बोललो होतो. पण अजून पर्यंत मला कुठलीही मुलगी आवडली नाही.” यावर तो फक्त हसला. 

आमच्या गप्पा अशाच रंगल्या होत्या. साधारण १२ वाजले असावेत. गाडीचा वेग कमी झाल्याचे जाणवले म्हणून बाहेर पाहिले तर आंध्र प्रदेशातील अनंतपुर स्टेशनवर गाडी थांबत होती. आमचा चार तासांचा प्रवास झाला होता. इतक्यात आमच्या केबिनचं दार वाजलं. थोडंसं आश्र्चर्याने आणि अनिच्छेने आम्ही दार उघडले 

दारात टीसी उभा होता. थोडंसं आत येऊन त्यांनी विचारले, "आप में से रायचुर स्टेशनपे कौन उतरनेवाला है?" 

सौरभ पुढे येऊन, "मैं, सौरभ" म्हणाला. 


सौरभ काल्पनिक चित्र 

त्यावर टीसी  म्हणाला, "ठिक आहे, तुमच्या केबिनमध्ये तात्पुरते एक तिकीट अपग्रेड केले आहे. पुढच्या स्टेशनवर तो व्यक्ती येईल त्याला जागा द्या." सौरभ उतरल्यावर ते तिकीट कन्फर्म होईल. 

आम्ही याला विरोध केला असता, टिसीने सांगितले की, " एक पॅसेंजर रायचुरला उतरणार आहे, तेव्हा फक्त तिथपर्यंतचा प्रश्न आहे. दोन तास ऍडजस्ट करा." 

ऐनवेळी एका पॅसेंजरने त्याचे तिकीट रद्द केले त्यामुळे मग दिल्लीपर्यंत ती सिट रिकामीच राहणार होती. म्हणुन रिकाम्या झालेल्या सिटवर गुंटकळ जंक्शन पासून बुकिंग झालेले डिफेन्स कोट्यातील एक तिकीट टीसीने आमच्या केबिनमध्ये अपग्रेड केले. 

आमचा नाईलाज झाला. टिसी निघून गेला. आम्ही दोघांनी ठरवलं की काहीही झालं तरी त्या तिसऱ्या माणसाला शांतपणे बसु द्यायचं नाही. त्याला इतका त्रास द्यायचा की तो झोपला नाही पाहिजे. आम्हाला दोघांना खूप राग आला होता. बरोबर १.०० वाजता गाडी गुंटकळ जंक्शनला पोहोचली. गाडी थांबताच पुन्हा दार वाजलं. 

आम्ही मुद्दाम लवकर दार उघडले नाही. दोन तीन मिनिटे दार तसेच वाजवुन दिले. बाहेरून हाका मारल्याचा आवाज आला तेव्हा मग दरवाजा उघडला. तोच टी सी बाहेर उभा होता. तो आमच्या कडे पाहात काहीसा रागानेच म्हणाला, "आप लोग उपर या निचे की बर्थ पर सो जाओ, और एक बर्थ खाली करो." 

तो बोलत असताना एक हमाल मागे बॅगा घेऊन आला आणि तो सामान आत ठेवून निघून गेला. आमच्या केबिनमध्ये येणारा तिसरा आगंतुक पाहुणा कोण? हे पहायला आता आम्हीही उत्सुक होतो. "आईये अंदर साहब", टिसी मागे वळून बोलला आणि थोडासा बाजूला झाला. आणि "त्याने" आमच्या केबिनमध्ये प्रवेश केला. पण फक्त केबिनमध्येच नव्हे तर 'त्याच्या' रुपाने माझ्या आयुष्यात ही एका 'नव्या वादळाचा' प्रवेश झाला होता. 

कोण होता तो? 

एक पंजाबी सरदारजी. जो युनिफॉर्म वरुन तरी आर्मी ऑफिसर वाटत होता. वय साधारण ३५--३६ असावे.६ फुटांवर उंची, गोरापान रंग, लाल गुलाबी ओठ, लांबसडक धारदार नाक, गहीरे काळे डोळे, मजबूत पिळदार सुडौल शरीरयष्टी, काळीभोर ट्रिम दाढी मिशा, डोक्यावर पगडी आणि चेहऱ्यावर लष्करी करारीपणा. 

आत येताच मोठे काळेभोर डोळे आमच्याकडे रोखत गंभीर आवाजात बोलला, "यही है वह दोनो?" 

टिसी "हो" म्हणाला व निघुन गेला. 

"कोई बात नहीं, बच्चो आरामसे सो जाओ" असे म्हणत तो आमच्या शेजारी बसला. तसे पटकन उठून आम्ही दोघे वरच्या बर्थवर पळालो. दरम्यान गाडी स्टेशनवरून सुटली होती. आम्हाला काही सुचत नव्हते. त्याच्या आर्मी युनिफॉर्मला बघुन आम्ही घाबरलो होतो. 

५--१० मिनिटे अशीच शांततेत गेली आणि मग तोच उभा राहुन आमच्याशी बोलायला लागला. "आपका नाम क्या है?" त्यानं पहिला प्रश्न माझ्याकडे बघून विचारला आणि मी सुचकतेने सौरभ कडे पहिले आणि हळुच डोळा मारत इशारा केला. त्याच्या अनुभवी नजरेने ते अचुक ओळखले. 

इतक्यात सौरभ बोलला, "मेरा नाम सौरभ है और ये है स्वप्निल" असे म्हणत त्याने माझ्याकडे बोट दाखवले. तो माझ्याकडे रोखुन पहात किंचित हसला. कुठे जाणार वगैरे चार दोन प्रश्न विचारून झाले. मला असं जाणवलं की प्रत्येक वेळी बोलताना तो फक्त माझ्याकडेच बघुन बोलतोय. 

मी त्याच्याकडे पाहत असताना २--३ वेळा आमची नजरानजर झाली. मी लगेच नजर चोरली पण तो माझ्याकडेच पहात होता. मग मी ही धाडस करुन त्याच्याकडे नजर रोखली आणि त्याच्या डोळ्याला डोळा भिडवला. तो माझ्या डोळ्यात पहात होता आणि मी त्याच्या. 

त्याचे काळेभोर डोळे वरुन एक खोल खोल शांत डोहासारखे वाटत होते तरी आतमध्ये कुठेतरी प्रचंड खळबळ माजली असावी असे मला वाटले. त्याच्या डोळ्यात मला एकप्रकारची व्याकुळता जाणवली. मी पटकन नजर फिरवली. सौरभने त्याला नाव विचारले, पण तो कसल्या तरी विचारात हरवून गेला असावा त्यामुळे त्याने उत्तर दिले नाही. 

मी म्हणालो, "सर वो कुछ पूछ रहा है" तेव्हा तो भानावर आला आणि म्हणाला "बोलो?" 

मग नाव विचारल्यावर त्याने "सिमरजित सिंग" असे नाव सांगितले. त्याचं आणि सौरभचे बोलणं चालू होते. त्याचे पोस्टींग अंदमान निकोबार येथे असुन तो त्याचे घरी पंजाबला लुधियाना येथे सुट्टीवर निघाला होता. 

इतके त्यानं सांगितलं. त्यावर मी जरा रागानेच म्हणालो, "हमें निंद आ रही है, आप भी सो जाईये." त्यावर तो फक्त हसला आणि आणि खालच्या बर्थवर झोपला. मी सौरभकडे रागात पाहिलं. त्यावर त्याने खुणेनेच काय झाले असे विचारले. 

मी म्हणालो, "आपलं काय ठरलं होतं? मग त्याला त्रास द्यायचा सोडून तु त्याच्याशी का बोलत बसलाय?" 

सौरभ म्हणाला की, "अरे तो मिलीट्री ऑफिसर आहे, किती चांगला आहे, कशाला उगाच त्रास द्यायचा?" 

मला खूप राग आला आणि मी सौरभला सांगितले की, "काही चांगला वगैरे नाही तो. माझ्या कडे कसं बघत होता पाहीलंस का? मुकाट्याने मी सांगतो तसं कर." आम्ही दोघांनी मोठ्या आवाजात गाणी म्हणायला सुरुवात केली. 

थोड्या वेळाने त्याने विचारले, "आपको गाना बहोत पसंद है क्या?" आम्ही कांहीच बोललो नाही म्हणुन मग त्याने मोबाईल वर एक गाणे चालू केले आणि माझ्या कडे पहात बोलला, "ये सुनो, तुसी बहोत पसंद आयेगा, वाहे गुरु की कसम." मी सौरभकडे पहिले इतक्यात गाणे चालू झाले... 

ऑखों में तेरी, अजबसी 
अजबसी अदाॅऐं है, 
दिल को, बना दे जो पतंग सांसें. 
यें तेरी वो हवायें है!! 
....... 
....... 

गाणं संपलं. त्याने पुन्हा दुसरं गाणं लावलं. 


ये ऑखें देखकर हम, 
सारी दुनिया भुल जाते है, 
इन्हे पानें की धुन में हर 
तमन्ना भुल जाते है!! 

------------- 
-------------- 
--------------- 

आता मला प्रश्न पडला की, हे गाणं आहे की काॅम्प्लिमेंट? मग गाणं संपलं की थोड्या वेळाने मी हळूच एक छोटी बॅग मुद्दाम खाली ढकलली. ती त्याच्या पायावर पडली. तो अर्धवट झोपेत होता, एकदम दचकून उठला. 

मी पटकन खाली उतरुन "सर, साॅरी साॅरी, आपको लगा तो नहीं?" असे म्हणत बॅग उचलली. आणि मुद्दामच डोळे रोखुन पहात गालात हसत त्याला खुन्नस दिली. 

त्याने पटकन माझा हात पकडला व मला पुढे ओढले आणि डोळे मिचकावत हळूच म्हणाला, "इस बार तो नहीं लगा, सच्ची? वाहे गुरु की कसम?" 

मला काहीच समजेना, मी एक जळजळीत कटाक्ष टाकला व पटकन हात सोडवून वर गेलो. थोड्यावेळाने पुन्हा त्याची झोप लागत आहे असे बघुन आम्ही मुद्दाम एकमेकांना बावळट सरदारजींचे जोक्स मोठ्या आवाजात सांगुन जोरात हसायला लागलो. 

त्या आवाजाने तो जागा झाला. आता मात्र तो चिडला. आणि रागारागाने डोळे वटारून आमच्या कडे पहात ओरडला, "ओय बंद करो ये आवारगी और चुपचाप सो जाओ वरना एक रख के दुॅगा, वाहे गुरु की कसम." 

आम्ही गप्प झालो, घाबरून एकमेकांकडे एक - दोन क्षण पाहीले आणि जोरजोरात हसत सुटलो. तो वैतागला आणि रागाने सीटवर बसला. मी खुप खुश होतो आमचा डाव यशस्वी झाल्यामुळे. त्याची झोपमोड झाली होती. आता ०२.३० होत आले. सौरभचा मोबाईल अलार्म वाजला. तसे आम्ही भानावर आलो. 

रायचुर जवळ आलं होतं. सौरभने त्याच्या मावसभावाला काॅल केला तर तो नुकताच स्टेशनवर पोहोचला होता. थोड्याच वेळात स्टेशन येणार होते. सौरभने आवराआवरी करून बॅग घेऊन तयार झाला. इकडे आमच्या केबिनमधला 'तो तीसरा' सरदारजी डोळे झाकुन पडला होता. झोपला की जागा होता माहीत नाही. पण त्याच्या मोबाईल वर गाणं चालू होतं, 

वो भुली दास्ताॅ, लों फिर याद आ गयी 

नज़र के सामने, घटा सी छा गयी.. 

............... 

सौरभ निघाला म्हणुन मी त्याला सोडायला बोगीच्या दरवाजा पर्यंत गेलो. मी जाता जाता (थोडे तुच्छतेने) मागे वळून पाहिले तर सरदारजी तसाच पडून होता. 

"काय रडवं गाणं ऐकतोय हा! अरे देवा! अशा माणसाबरोबर आता प्रवास करायचा." हा सहज विचार मनात आला, आणि केबिनचा दरवाजा पुढे ओढुन मी गाडीच्या दरवाजाकडे गेलो. गाडीचा  स्पिड कमी झालं होतं. साधारण १० मिनिटांत गाडी प्लॅटफॉर्मवर थांबली. 

रात्रीचे ०२.५० झाले होते. सौरभ खाली उतरत असताना एक हमाल गडबडीत गाडीत चढत होता म्हणुन त्याला, "आम्हाला उतरु देत मग वर ये" असे म्हणत असताना तो म्हणाला "कशाला उगाच गडबड करता, गाडीला क्राॅसिंग आहे, गाडी १५-२० मिनिटे थांबेल." 

तेवढ्यात सौरभच्या मावसभावाचा फोन आला की तो नाॅर्थ गेटवर थांबला आहे. इंजिनच्या दिशेने चालत येऊन तसेच पुढे गेल्यावर डावीकडे वळून बाहेर आल्यावर गेट लागेल. मी सौरभला म्हणालो, "चल, मी पण येतो गेटपर्यंत सोडायला, गाडी पण थांबणार आहे." 

तो नको म्हणत असतानाही मी गेलो. आम्ही भराभर चालत गेटपर्यंत पोहोचलो. गेटबाहेर इतर काही अन्य लोक व सौरभचा मावसभाऊ उभे होते. त्याने सौरभला हात केला. आणि तो पुढे आला. इतक्यात गाडीचा हॉर्न वाजला. 

सौरभ म्हणाला "गाडी सुटली काय रे?" 

मी म्हणालो, "नसेल रे, क्राॅसिंग आहे ना मग लगेच कशी सुटेल?" 

तेवढ्यात सौरभच्या मावसभावाने सांगितले "अरे डबल ट्रॅक आहे, इथे क्राॅसिंग नसते गाडीला." मला काहीच कळेना काय होतंय. 

तेवढ्यात सौरभ ओरडला, "अरे पळ, गाडी सुटली." मी मागे वळून पाहिले तर खरोखरच गाडी सुटली होती. आता मात्र मी पळत सुटलो. सौरभला 'बाय' सुद्धा केला नाही. 

मी प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तोवर इंजिन पुढे गेलं होतं मागोमाग ४-५ डबे देखील पुढे निघून गेले होते. काय करावं काही सुचेना.

(अपूर्ण )


कुणाला डोळे आवडतात तर कुणाला पाय

आजकल पांव जमींपर भाग १


या कॉलेजच्या मुलांची मस्ती फार भारी
वा-सोट्यावर चढाई









  • या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.
  • अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.
  • प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 



  • 1 comment:

    1. Lovely start Swapnil.
      बिट्टू भाई, आपका तो क्या कहना।
      परिस आहे तूझ्या हातात.

      ReplyDelete

    Followers