Copy Not Allowed

Tuesday 23 March 2021

नक्षत्र बागवे - अभिमानाचा क्षण

मूळ बातमी येथे पहा “नक्षत्र बागवेला तरुण तेजांकीत पुरस्कार ” – लोकसत्ता

निर्भीड आयुष्य जगण्यासाठी आम्हाला पुरस्कार दिला जातो तेव्हा स्वत:चा अभिमान वाटतो. आमच्या समलिंगी समाजाला लोकांनी कायमच दूषणे दिली आहेत. नाना विशेषण देऊन लोक हिणवतात. पण जेव्हा इतके मोठे माध्यम आमची दखल घेते तेव्हा माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा मिळते. – नक्षत्र बागवे

नक्षत्र बागवे – Thanks from Internet

सौरभ (नक्षत्र) बागवे (समाजकारण) : भारतातला पहिला ‘गे’ ब्रँड अम्बॅसिडर

विरारमधल्या सामान्य घरात वाढलेला सौरभ बागवे. आपली समलैंगिकता न लपवता ती ताठ मानेने मिरवणारा, समलैंगिकांनाही मनमुक्त, सर्वसामान्य जगण्याचा अधिकार आहे, हे ठामपणे सांगणारा एक अभिनेता, उद्योजक आहे. सौरभ भारतातला पहिला गे ब्रँड अम्बॅसिडरसुद्धा आहे. समलैंगिक व्यक्तींनाही प्रवासाचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी त्याची ‘द बॅकपॅक ट्रॅव्हल्स’ ही कंपनी विशेष प्रयत्न करते. सौरभ ऊर्फ नक्षत्र हा एलजीबीटीक्यूंच्या हक्कांसाठी लढा देणारा सामाजिक कार्यकर्ताही आहे.

एका सामान्य कुटुंबातील मुलाने आपले वेगळेपण ओळखून ते मान्य करण्याचा सौरभचा प्रवास कधीच सोपा नव्हता. पण आपल्यासारखेच वेगळेपण असलेल्या इतरांसाठी हा प्रवास सोपा व्हावा यासाठी सौरभ नक्कीच प्रयत्न करतो. विविध कार्यक्रम आणि चर्चासत्रांद्वारे एलजीबीटीक्यू समूहाचा संघर्ष, व्यथा आणि त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनाही समाजात आनंदाने जगता यावे यासाठी उपक्रम राबवतो. देशातल्या विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन याविषयी प्रबोधन करतो.  सौरभ म्हणतो, ‘‘एलजीबीटीक्यू समूहाला हक्काचा, मानाचा, सुरक्षित आणि आमच्या अस्तित्वाची जाणीव असलेला समाज हवाय.’’

आपले बहुतांश काम सौरभ समाजमाध्यमांद्वारे करतो. तो विविध लघुचित्रपट, ब्लॉग इत्यादी माध्यमांतून एलजीबीटीक्यू समूहाच्या समस्या मांडत असतो. २०१९ मध्ये त्याने २५ ब्रँडसोबत इन्फ्ल्यूएन्सर अम्बॅसिडर म्हणून करार केला, तर ब्रँड अम्बॅसिडर म्हणून तीन आंतरराष्ट्रीय, तर एका राष्ट्रीय ब्रँडसोबत करार केला आहे.

No comments:

Post a Comment

Followers